प्रेमात अडसर ठरणाऱ्या आईची मुलीने प्रियकराच्या मदतीने हत्या केल्याची धक्कादायक घटना अहेरी येथे उघडकीस आली आहे. निर्मला अत्राम असे मृत महिलेचे नाव आहे. दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

निर्मला यांची मुलगी ऊर्मिला आणि रुपेश येगंधलवार यांच्यात प्रेमसंबंध होते. मात्र, ते आईला खटकत असल्याने दोघांनी मिळून निर्मला यांची हत्या केल्याचा संशयावरून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऊर्मिलाचे वडील चंद्रकांत अत्राम हे पोलिस विभागात नोकरीवर होते. २० वर्षांपूर्वी त्यांची नक्षल्यांनी हत्या केली होती. तेव्हापासून उर्मिलाचे पालनपोषण आईनेच केले. ऊर्मिलाला वडिलांच्या जागेवर अनुकंपा तत्त्वावर नोकरीची संधी सुध्दा होती. परंतु, आईचीच हत्या केल्याने ऊर्मिलाला गजाआड व्हावे लागले. घटनेचा तपास अहेरीचे पोलीस निरीक्षक गव्हाणे करत आहे.