‎गडचिरोली : नक्षलवाद्यांकडून दुर्गम भागात दहशत निर्माण करून आपले अस्तित्व दाखविण्यासाठी उभारण्यात आलेल्या स्मारकांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली. कटेझरी पोलीस ठाणे हद्दीतील मौजा कटेझरी व मर्मा जंगल परिसरात दोन ते तीन वर्षांपूर्वी नक्षलवाद्यांनी उभारलेली दोन स्मारके जिल्हा पोलिसांनी उद्ध्वस्त केली. या कारवाईमुळे नक्षलवादी कारवायांना धक्का बसला असून परिसरातील नागरिकांत समाधानाचे वातावरण आहे.

‎३० सप्टेंबरला कटेझरी पोलीस ठाण्याचे पथक व एसआरपीएफचे जवान जंगल परिसरात शोधमोहीम राबवीत असताना ही कारवाई करण्यात आली. संशयास्पद ठिकाणी बीडीडीएस पथकाने तपासणी करून ही स्मारके पाडण्यात आली. यावेळी स्थानिक नागरिकांच्याही मदतीने स्मारकांचा नायनाट करून त्याठिकाणी शांततेचे प्रतीक म्हणून वृक्षारोपण करण्यात आले.

‎‎पोलिसांनी उपस्थित गावकऱ्यांना आवाहन केले की, नक्षलवाद्यांच्या खोट्या भुलथापांना बळी न पडता पोलिसांना सहकार्य करून गावाचा विकास साधावा. जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले की, गडचिरोली पोलिस दल नक्षलवाद्यांच्या दहशतीपासून नागरिकांना मुक्त करण्यासाठी कटिबद्ध आहे. समाजात अशाप्रकारच्या स्मारकांना कुठेच स्थान नाही. त्यामुळे अशा बेकायदेशीर बांधकामांमध्ये कोणीही सहभागी होऊ नये.

‎‎ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल,अपर अधीक्षक एम. रमेश,सत्य साई कार्तिक,अधीक्षक गोकुल राज जी. तसेच सहाय्यक अधीक्षक अनिकेत हिरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी कटेझरी ठाण्याचे प्रभारी अधिकारी उपनिरीक्षक अजय

जवानांची रेकी करणाऱ्या नक्षल समर्थकास अटक, घातपाताचा होता डाव

घातपात घडवून आणण्यासाठी सुरक्षा दलांची रेकी करणाऱ्या एका कट्टर नक्षल समर्थकाला पोलीस दल व सीआरपीएफच्या जवानांनी २९ सप्टेंबरला अटक केली. सैनू उर्फ सन्नू अमलू मट्टामी (३८, रा. पोयारकोठी ता. भामरागड) असे त्याचे नाव आहे. भामरागड परसिरातून त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या.

सैनू मट्टामी हा २७ ऑगस्टला कोठी हद्दीतील कोपर्शी-फुलनार जंगल परिसरात झालेल्या चकमकीत सक्रिय होता. त्याच्यावर विविध विध्वंसक कारवायांमध्ये सहभागी असल्याचा संशय आहे. २९ सप्टेंबरला भामरागड पोलीस व सीआरपीएफ ३७ बटालियनचे जवान नक्षलवादविरोधी अभियान राबवित असताना गोपनीय माहितीच्या आधारे त्यास ताब्यात घेतले.

या कारवाईत भामरागड पोलीस व सीआरपीएफ जवान यांनी संयुक्तरीत्या सहभाग घेतला. विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) संदीप पाटील, पोलीस उप-महानिरीक्षक अंकित गोयल, सीआरपीएफचे उप-महानिरीक्षक अजय कुमार शर्मा, पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

मरकणार गावात नक्षलवाद्यांना प्रवेशबंदी

भामरागड तालुक्यातील कोठी पोलीस ठाणे हद्दीतील अतिदुर्गम मरकणार गावाने नक्षलवाद्यांना गावबंदी जाहीर केली आहे. ३० सप्टेंबर रोजी झालेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी एकमताने हा ठराव मंजूर करून तो अपर पोलीस अधीक्षक (प्राणहिता) सत्य साई कार्तिक यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी गावकऱ्यांनी गावातील एक भरमार बंदूक देखील पोलिसांच्या ताब्यात दिली. सन २००३ पासून राबविल्या जाणाऱ्या नक्षल गावबंदी योजनेसोबतच पोलिसांच्या ‘दादालोरा खिडकी’ व विविध नागरी कृती उपक्रमांचा सकारात्मक परिणाम दुर्गम भागातील जनतेवर दिसून येतो आहे. त्यामुळे जानेवारी २०२४ पासून आजवर भामरागड उपविभागातील तब्बल ४० गावांनी नक्षलवाद्यांना गावबंदीचा ठराव एकमुखाने मंजूर केला आहे. ‎‎मरकणार गाव अबुझमाडच्या सीमेवर असल्याने पूर्वी येथे नक्षलवाद्यांचा मोठा प्रभाव होता.

नक्षलवाद्यांनी हिंसक वाट सोडून आत्मसमर्पण करून सन्मानाने जीवन जगावे. परिसरात नक्षलवादविरोधी अभियान आणखी तीव्र करण्यात येणार आहे, असे गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी म्हटले आहे.