नागपूर: गडचिरोली जिल्हा हा महाराष्ट्र राज्याच्या उत्तर-पूर्व दिशेला वसलेला असून तेलंगणा व छत्तीसगड राज्याच्या सीमा लागून आहेत. गडचिरोली जिल्हा हा पूर्णपणे नक्षल प्रभावित जिल्हा म्हणून ओळखला जातो. येथील ७६ टक्के भाग हा जंगलाने व्यापलेला असल्याने घनदाट जंगलात नक्षल समर्थित लोक आश्रय घेतात. मात्र, अशा भागामध्ये राहून काही तरुणांनी कौशल्य विकासाच्या माध्यमातून आपल्या यशाचा मार्ग शोधला आहे. कौशल्य विकासचे अभ्यासक्रम करून त्यांना रोजगार उपलब्ध झाला असून हे तरुण वर्षाला ६० हजार रुपये कमावत आहेत.

वडिलांचे लहानपणी निधन झाल्याने कुटुंबाची जबाबदारी निभावताना कौशल्यविकासाचा अभ्यासक्रम केला. आपल्या गावातील इतर आदिवासी तरुणांनाही असा अभ्यासक्रम करायला प्रेरित केले. याचा परिणाम म्हणजे गडचिरोलीतील तरुण बांधकामाचे एकत्र कंत्राट घेऊन वर्षाला ६० हजार रुपये कमवत आहेत. ही कथा आहे गडचिरोली जिल्ह्यातील येडसगोंडी गावात राहणाऱ्या अविनाश डुग्गा या आदिवासी तरुणाची.

हेही वाचा : वाघ आला रे आला! त्या दोघांनी मोठ्या हिंमतीने वाघाला लावले पळवून अन्…

अविनाश गडचिरोलीतील धानोरा नजिकच्या येडसगोंडी गावात आपल्या आई आणि बहिणीसह राहतो. अविनाश वर घरची जबाबदारी असल्याने त्याने बारावी झाल्यावर कधी आपल्या तसेच दुसऱ्यांच्या शेतात शेतमजूर म्हणून काम करायला सुरूवात केली. मात्र, यातून मिळणारे उत्पन्न तुटपुंजे असल्याने, महिन्याचा खर्च भागवणे अविनाशला जड झाले होते. यानंतर त्याने युवा परिवर्तन संस्थेचा कौशल्यविकास अभ्यासक्रम पूर्ण केला. यात प्लबिंग, गवंडी काम ही कामे तो शिकला. हे शिकतानाच संस्थेमार्फत सुरु असेले ‘कम्युनिटी सेंटर्स’ आणि शौचालये बांधायची कामे केली. यामुळे त्याला गवंडी कामाचे प्रात्यक्षिक ज्ञान मिळाले. त्याच्यासोबत गावातील इतर १०-१५ मुलांनीही हा अभ्यासक्रम करत गवंडी काम शिकले. अविनाशने आपल्या गावातील इतर मुलांना एकत्र घेऊन गावातील छोटी मोठी गवंडी काम करायला सुरूवात केली. अविनाश आणि त्यांच्या मित्रांचे काम आवडल्याने त्याला धानोरामधील इतरही गवंडी कामाची कंत्राट मिळायला सुरूवात झाली. नुकतेच त्यांना अनेक खासगी व्यवसायिक कंपन्यांची कामेही मिळत आहेत.

हेही वाचा : गुन्हेगार शिरजोर होत असताना ठाण्यात पोलीस नाहीत…राज्यात तब्बल अडीच हजारांपेक्षा जास्त पदे…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कौशल्य अभ्यासक्रमाचे महत्त्व सांगितले

फक्त इयत्ता बारावी शिकलेला अविनाश आज येगडगोंडी गावात मुला मुलींना प्रेरणा देत आहे. मी गवंडी काम शिकल्यावर माझ्या गावातील मुलांना गवंडी कामाचे महत्व समजावले. पहिल्यांदा आम्हाला कोणी काम द्यायचे नाही. मग छोटी काम करून आता आम्हाला मोठ्या कंपन्यांचे कंत्राट मिळत आहे. मला पुढे यातच काम करायचे आहे, असेही अविनाश सांगतो.