अकोला : दक्षिण मध्य रेल्वेच्या काझीपेठ-बल्हारशाह विभागात ‘नॉन-इंटरलॉकिंग’च्या कामामुळे गांधीधाम-विशाखापट्टणम एक्स्प्रेस आणि ओखा-पुरी एक्स्प्रेस गाड्या वळवलेल्या मार्गावर धावणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागेल.गांधीधामहून धावणारी गाडी क्रमांक २०८०४ गांधीधाम-विशाखापट्टणम एक्स्प्रेस गाडी बदललेल्या मार्गाने ७ जानेवारी २०२४ रोजी नागपूर, रायपूर, तिटीलागड, रायगड, विजयनगरम या मार्गे धावेल. ही ट्रेन वर्धा, चंद्रपूर, बल्हारशाह, सिरपूर कागजनगर, रामागुंडम, वारंगल, खम्मम, विजयवाडा, एलुरु, राजमुंद्री, समलकोट, दुव्वाडा या स्थानकांवर जाणार नाही. या गाडीचा मार्ग सुरत, भुसावळ, अकोला, वर्धा, चंद्रपूर, वारंगल, विजयवाडा असा असतो.
विशाखापट्टणम येथून ४ आणि ११ जानेवारी रोजी धावणारी गाडी क्रमांक २०८०३ विशाखापट्टणम-गांधीधाम एक्स्प्रेस गाडी विझियानगरम, रायगड, तितिलागड, रायपूर, नागपूर मार्गे वळवलेल्या मार्गाने धावेल. ही ट्रेन दुव्वाडा, समलकोट, राजमुंद्री, एलुरु, विजयवाडा, खम्मम, वरंगल, रामागुंडम, सिरपूर कागजनगर, बल्हारशाह, चंद्रपूर, वर्धा या स्थानकांवर जाणार नाही.ओखा येथून ३ आणि १० जानेवारी रोजी धावणारी गाडी क्रमांक २०८२० ओखा-पुरी एक्स्प्रेस गाडी तिच्या नियोजित मार्गाऐवजी नागपूर, रायपूर, तितलागढ, रायगड, विजयनगरम या मार्गावर वळवली जाईल. ही ट्रेन चंद्रपूर, बल्हारशाह, सिरपूर, कागजनगर, मंचिरयाल, रामागुंडम, वारंगल, विजयवाडा, एलुरु, राजमुंद्री, समलकोट, अनकापल्ले, विशाखापट्टणम या स्थानकांवर जाणार नाही.
हेही वाचा >>>पश्चिम विदर्भात तुरीचे दर ९ हजारांवर स्थिर; महिनाभरात दीड हजार रुपयांची घसरण
गाडी क्रमांक २०८१९ पुरी येथून ७ जानेवारी रोजी धावणारी पुरी-ओखा एक्स्प्रेस बदललेल्या मार्गाने विजयनगरम, रायगड, टिटीलागड, रायपूर, नागपूर या मार्गाने धावेल. ही गाडी विशाखापट्टणम, अनकापल्ले, समलकोट, राजमंत्री, एलुरु, विजयवाडा, वारंगल, रामागुंडम मंचिरयाल, सिरपूर कागजनगर, बल्हारशाह, चंद्रपूर या स्थानकांवर जाणार नाही.