नागपूर : एकतर्फी प्रेमातून एका गुंडाने तरुणीचा छळ सुरू केला. फोनवर प्रतिसाद देत नसल्याने तो थेट तिच्या घरात घुसला. ठार मारण्याची धमकी देत अश्लील चाळे सुरू केले. बळजबरीने तिच्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला. तरुणीने आरडाओरड केली असता आरोपीने पळ काढला. ही घटना एमआयडीसी पोलीस ठाण्यांतर्गत घडली. शुभम महादेव प्रधान (२८) रा. आयसी चौक, हिंगणा रोड असे अटकेतील गुंडाचे नाव आहे.

शुभमवर खून, खुनाचा प्रयत्न, चोरी आणि जबरी चोरीसह एक डझनहून अधिक गुन्हे नोंद आहेत. परिसरात राहणाऱ्या पीडितेवर त्याचे एकतर्फी प्रेम आहे. तो कधीही पीडितेला फोन करून त्रास देत होता. त्यामुळे पीडितेने त्याचा नंबर ब्लॉक केला. प्रतिसाद मिळत नसल्याने शुभम चिडला. रात्री ९ वाजताच्या सुमारास तो पीडितेच्या घरात घुसला. ‘माझा फोन उचलत का नाही’ असे म्हणून शिवीगाळ करू लागला. लग्नाची मागणी घालून नकार दिल्यास ठार मारण्याची धमकी दिली.

हेही वाचा: ‘भारत जोडो’चे पडद्यामागील किस्से आणि व्यवस्थापन यंत्रणेचे अनुभव

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न करू लागला. तरुणीने मदतीसाठी ओरड केली असता शुभमने पळ काढला. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. एमआयडीसी पोलीस घटनास्थळावर पोहोचले. तरुणीच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवून शुभमला अटक केली. न्यायालयाने शुभमला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.