girl student suicide tumsar taluka Ksn 82 ssb 93 | Loksatta

भंडारा : ‘आय एम सॉरी मम्मी… लव्ह यू’, आईला मेसेज पाठवून विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल

तनिष्का उर्फ निधी जितेंद्र पाटील (१८) रा. हसार टोली, ता. तुमसर, असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.

girl student suicide tumsar taluka
आईला मेसेज पाठवून विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल (छायाचित्र – लोकसत्ता टीम/ग्राफिक्स)

‘आय एम सॉरी मम्मी… लव्ह यू’… असा मेसेज आईला पाठवून बारावीच्या विद्यार्थिनीने आजीच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तुमसर तालुक्यातील हसारा येथे सोमवारी उघडकीस आली.

तनिष्का उर्फ निधी जितेंद्र पाटील (१८) रा. हसार टोली, ता. तुमसर, असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. ती तुमसर येथील मातोश्री विद्या मंदिरात बारावी विज्ञान शाखेत शिकत होती. मूळ नागपूर जिल्ह्यातील कामठी येथील तनिष्का वडिलांच्या निधनानंतर आपल्या आजीकडे शिक्षणासाठी राहत होती. रविवारी रात्री आपल्या मोबाईलवरून कामठी येथे राहत असलेल्या आईला, ‘आय एम सॉरी मम्मी… लव यू’, अशा आशयाचा मेसेज पाठवून मध्यरात्रीच्या सुमारास तिने आत्महत्या केली.

हेही वाचा – वर्धा : उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या कानपिचक्या; भाजप नेत्यांना आले भान, मगच मांडव भरला छान

हेही वाचा – अखेर “तारू” “बजरंगा”वर भारी पडला…

सोमवारी सकाळी मावशी व आजीने तनिष्का आतापर्यंत उठली का नाही म्हणून तिच्या खोलीत डोकावून बघितले असता ही घटना उघडकीस आली. तनिष्काला गळफास लावलेल्या अवस्थेत पाहून मावशी व आजीने एकच हंबरडा फोडला. तनिष्काच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. तुमसर पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-02-2023 at 12:55 IST
Next Story
अखेर “तारू” “बजरंगा”वर भारी पडला…