नागपूर: गणेशोत्सवानंतर नागपूरसह राज्यभरात सोन्याचे दर घटले होते. त्यामुळे ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरन असतांना आता पून्हा सोन्याचे दर वाढत आहे. शनिवारी नागपुरातील सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्याचे पुढे आले. नागपुरात १८ सप्टेंबरच्या तुलनेत २१ सप्टेंबरला सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम तब्बल १ हजार २०० रुपयांनी वाढले आहे. दरवाढीने ग्राहकांमध्ये चिंता वाढली आहे.

गणेशोत्सवाच्या काळात प्रथम सोन्याच्या दरात घट झाली असली तरी कालांतराने दरवाढ नोंदवण्यात आली. श्री गणेशाचे विसर्जनानंतर म्हणजे गणेशोत्सवाच्या दुसऱ्याच दिवशी नागपुरात सोन्याचे दर घसरले होते. परंतु आता पून्हा सोन्याचे दर हळू- हळू वाढतांना दिसत आहे. १८ सप्टेंबरला नागपुरात सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७३ हजार ३०० रुपये, २२ कॅरेटसाठी ६८ हजार २०० रुपये, १८ कॅरेटसाठी ५७ हजार २०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४७ हजार ६०० रुपये नोंदवले गेले. परंतु आता या दरात मोठी वाढ होतांना दिसत आहे.

हेही वाचा >>> नागपूर हादरले… आठ वर्षांच्या मुलीवर बलात्कार; नराधमास अटक

नागपुरातील सराफा बाजारात शनिवारी (२१ सप्टेंबर) सकाळी ११ वाजता सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७४ हजार ५०० रुपये, २२ कॅरेटसाठी ६९ हजार ३०० रुपये, १८ कॅरेटसाठी ५८ हजार १०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४८ हजार ४०० रुपये नोंदवले गेले. त्यामुळे सोन्याच्या दरात २१ सप्टेंबरच्या तुलनेत १८ सप्टेंबरला २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम १ हजार २०० रुपये, २२ कॅरेटचे दर १ हजार २०० रुपये, १८ कॅरेटचे दर ९०० रुपये, १४ कॅरेटचे दर ८०० रुपयांनी वाढलेले दिसत आहे. त्यामुळे सोने- चांदीचे दागिने खरेदीसाठी इच्छुक असलेल्या ग्राहकांची चिंता वाढली आहे. दरम्यान नागपुरात केंद्रीय अर्थसंकल्पानंतर सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली होती. परंतु त्यानंतर मात्र सतत कमी- अधिक प्रमाणात दर वाढतांना दिसत आहे.

हेही वाचा >>> चंद्रपूर : लोकप्रतिनिधींच्या मर्जीतील कंत्राटदारांना नोटीस; कारण काय?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चांदीच्या दरातही मोठी वाढ

नागपुरातील सराफा बाजारात २१ सप्टेंबरला बाजार उघडल्यावर सकाळी ११ वाजता चांदीचे दर प्रति किलो ८९ हजार ४०० रुपये नोंदवण्यात आले. हे दर १८ सप्टेंबरला गणेशोत्सव आटोपल्यावर प्रति किलो ८७ हजार ८०० रुपये नोंदवण्यात आले होते. त्यामुळे २१ सप्टेंबरच्या तुलनेत १८ सप्टेंबरला चांदीचे दराची तुलना केल्यास नागपुरात चांदीच्या दरातही प्रति किलो १ हजार ६०० रुपयांची वाढ झालेली दिसत आहे.