Nagpur Flood Situation : रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे नागपूरचा अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला असून परिसरातील वस्त्यांमध्ये पाणी शिरले. शेकडो घरात पाणी शिरले. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर सुमारे ३ वाजता ही घटना घडली.

शुक्रवारी दिवसभर पाऊस सुरू होता. रात्री पावसाची तीव्रता अधिक वाढली. त्यामुळे अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला. तलावाच्या एका टोकाला असलेल्या विवेकानंद पुतळ्याजवळ तलावाचा विसर्ग पॉईंट आहे. तेथून वेगाने पाणी प्रथम रस्त्यावर आणि नंतर रस्त्यालगतच्या अंबाझरी लेआऊटमधील घरात शिरले. रात्री ३ ते ३:३० च्या सुमारास परिसरात एकच वस्तीमध्ये एकच गोंधळ उडाला. याच वस्तीत अंधाची शाळा आहे.तेथे पाणी शिरले. मुलांना पहिल्या माळ्यावर हलवण्यात आले.

दरम्यान नागरिकांनी महापालिकेला कळवले. तेथील यंत्रणा त्तत्काळ घटनास्थळी गेली. महापालिकेचे सुमारे ४० अधिकारी घटनास्थळी पोहचले असून वस्त्यांमधील पाणी काढले जात आहे. सुरूवातीला तलाव फुटल्याची माहिती होती. पण महापालिका अग्निशमन विभागाने ती फेटाळली. तलाव ओव्हरफ्लो झाल्याचे सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आमदार विकास ठाकरे, अंबाझरीचे ठाणेदार,महापालिकेचे अधिकारी मदतकार्य करीत आहेत.