नागपूर : गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृहशहर नागपूरच्या लकडगंजमधील जुगार अड्डा चालविण्यावरून झालेल्या वादात तीन ते चार युवकांनी धारदार शस्त्रांनी दोघांवर हल्ला केला होता. त्यापैकी एकाचा जागीच मृत्यू झाला होता तर दुसरा गंभीर जखमी होता. त्या गंभीर जखमी युवकाचाही आज रविवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. गेल्या आठ दिवसांतील हे सहावे हत्याकांड असून शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडल्याचे चिन्हे दिसत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विशाल भगवान राऊत (३२, क्वेटा कॉलनी) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. तर नीरज शंकर भोयर (३०, गरोबा मैदान, लकडगंज) या युवकाचा शुक्रवारीच मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली. विलास वानखडे, नितीन वानखडे आणि शुभम अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. लकडगंज पोलिसांच्या आर्थिक दुर्लक्षामुळे अनेक जुगार अड्डे सुरु असून आरोपी विलास ऊर्फ मटर रामकृष्ण वानखडे (हिवरीनगर) याचाही मोठा जुगार अड्डा लकडगंजमध्ये सुरु आहे. विशाल राऊत आणि नीरज भोयर हे दोघेही आरोपी विलासचे मित्र असून जुगार अड्डा चालविण्यासाठी सहकार्य करीत होते.

हेही वाचा : VIDEO : ‘आर्ची’ कुटुंबकबिल्यासह दिसताच पर्यटक सैराट, टिपेश्वरच्या जंगलात झिंग झिंग झिंगाट!!!

जुगारीतील पैशाच्या देण्या-घेण्यावरून शुक्रवारी सकाळी विलास आणि नीरज या दोघांमध्ये बाचाबाची झाली. रात्री अकरा वाजताच्या सुमारास संघर्षनगर झोपडपट्टीत नीरज आणि विशालवर विलासने आपल्या साथिदारांच्या मदतीने हल्ला केला. या हल्ल्यात नीरज भोयर याचा मृत्यू झाला तर विशाल हा गंभीर जखमी झाला होता. त्याचा रविवारी दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या प्रकरणी नंदनवन पोलिसांनी दुहेरी हत्याकांडाचा गुन्हा दाखल केला. तीनही आरोपींना पोलिसांनी अटक केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Home minister devendra fadnavis home town nagpur three murders in 24 hours adk 83 css
First published on: 11-02-2024 at 14:08 IST