नागपूर: भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मूर्म चार ते सहा जुलै दरम्यान पूर्व विदर्भाच्या दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते ५ जुलैला नागपूर नजिकच्या कोराडी येथील रामायण सांस्कृतिक केंद्राचे लोकार्पण होणार आहे. भारतीय विद्या भवन या शैक्षणिक संस्थेच्याने रामायण सांस्कृतिक केंद्राची उभारणी तीन एकर जागेवरील दोन मजली इमारतीत करण्यात आली आहे. दक्षिण भारतीय शैलीत या केंद्राची रचना आहे.पहिल्या मजल्यावर महाकाव्य रामायणातील प्रसंग १०८ चित्रांच्या माध्यमातून दर्शवण्यात आले आहे.

दुसऱ्या मजल्यावर लावण्यात आलेली चित्र मालिका भारतीय स्वतंत्रता आंदोलनातील क्रांतिकारकांच्या योगदानावर आधारित आहे. त्यात १८५७ ते १९४७ पर्यंतचा लढा आणि त्यात सहभागी क्रांतीकारक तसेच स्वातंत्र्योत्तर काळात देशााठी शहीद झालेल्या परमवीर चक्र पुरस्कार विजेत्यांचा शौर्य इतिहास दर्शवण्यात आला आहे. चित्रांमधील घटना दर्शकांना समजाव्यात म्हणून त्याचे विवरण मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तीन भाषांमधून देण्यात आली आहे.

हेही वाचा >>> लोकजागर: दोघे सरस, एक निरस!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केंद्राची आंतरिक सजावट पौराणिक काळातील राजवाड्यासारखी आहे. रंगसंगती, ध्वनि प्रणाली आणि प्रकाश योजनाही त्याच काळाला साजेशी करण्यात आली आहे. पंतप्रधानांच्या हस्ते होणार होते लोकार्पण केंद्राचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एप्रिल महिन्यातील नागपूर दौऱ्या दरम्यान करण्यात येणार होते. त्यासाठी तयारीही झाली होती. पण पंतप्रधानांचा दौरा रद्द झाल्याने ते राहिले. आता पाच जुलैला राष्ट्रपतींच्या हस्ते नियोजित आहे.