आपल्या विविध मागण्यांसाठी तीन दिवसांपासून उपोषण करणाऱ्या तब्बल ५० जणांच्या  आंदोलनाकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे दुर्दैवी चित्र आहे. आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भूमी हक्क परिषदेच्या पुढाकाराने ४ फेब्रुवारी पासून उपोषण सुरू करण्यात आले आहे. आहे.

हेही वाचा >>> काँग्रेसचे ठरले… भंडारा लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार निश्चित! लवकरच घोषणा!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संस्थापक अध्यक्ष के.जी.शाह यांच्या नेतृत्वात ५० महिला पुरुष उपोषण करीत आहे. जिल्हास्तरीय वनहक्क समितीने नामंजूर केलेले वनहक्क  अपील दाव्यांचे  पुनर्विलोकन करण्यात यावे, माळेगाव वनवस्ती येथील दावेदाराच्या पुन्हा तपासणी करण्यात यावी, १९९० पूर्वीच्या पात्र ई-क्लास अतिक्रमण धारकांना त्वरित मालकी हक्काचे कायम पट्टे वाटप करण्यात यावे, वनक्षेत्रातील गौण खनिज चोरी संदर्भात केलेल्या तक्रारीवर कारवाई व्हावी, यासह  १३ प्रलंबीत मागण्यासाठी  आंदोलन करण्यात येत आहे. आंदोलनाकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे ही संघटनेचे अध्यक्ष शाह यांनी म्हटले आहे. मागण्यांचे निवेदन शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी यांना देण्यात आले आहे. निवेदनावर के.जी.शाह, रामकृष्ण मोरे, राजेश गायकवाड, मुशीर खान, दामोदर साळवे, अकील शाह, बबन खंडारे,  कुशिवर्ता माळी, अशोक गायकवाड, नासीर जमादार, सईद शाह, कमल बाई कांबळे, शेख नासीर, शेख इरफान यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.