नागपूर : महाराष्ट्रात हळूहळू थंडीला सुरुवात झाली असली तरी पुन्हा एकदा वातावरणात बदल होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात तयार होऊ घातलेल्या चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रातही दिसून येणार आहे. त्यामुळे पुण्यासह कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

हेही वाचा – नागपूर : राष्ट्रपतींच्या कार्यक्रमावर लक्षावधींचा खर्च, रुग्णांची मागणी दुर्लक्षित, पेशंट राईट फोरम उपोषण करणार

हेही वाचा – नागपूर : मुलीने ‘रिल्स’ बघताच वडिलांचे प्रेमप्रकरण उघडकीस

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

येत्या रविवारी उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार ही प्रणाली २५ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास खेपुपारा आणि चितगाव दरम्यान बांगलादेश किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार झाले असून ते चक्रीवादळ पुढे सरकत आहे. भारतीय किनारपट्टीवर त्याचा फारसा परिणाम होणार नाही. या चक्रीवादळाला इराणने दिलेल्या ‘हॅमून’ नावाने ओळखले जात आहे.