अकोला : ५०० रुपयांची मागणी केल्यानंतर २०० रुपये दिले म्हणून तृतीयपंथीयांनी एका टेलरला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना अकोल्यात घडली. कौलखेड चौक परिसरात मंगेश टेलर्सचे दुकान आहे. रात्री ते दुकानामध्ये त्यांच्या मुलासोबत कापड शिवण्याचे काम करीत असताना यावेळी पाच ते सहा तृतीयपंथी त्यांच्या दुकानामध्ये आले. त्यांनी पाचशे रुपयांची मागणी केली. मात्र, त्यांच्याकडे पाचशे रुपये नसल्याने त्यांनी २०० रुपये देतो म्हणून सांगितले. यावरून तृतीयपंथीयांना संताप अनावर झाल्याने त्यांनी पुन्हा ५०० रुपयांची मागणी करीत गोंधळ सुरू केला.

हेही वाचा : मनसेने काढली आरोग्य व्यवस्थेची अंत्ययात्रा…

त्यानंतर काही वेळातच मंगेश टेलर्स व त्यांच्या मुलास जबर मारहाण करून पैसे हिसकाण्याचा प्रयत्न केला. तृतीयपंथीयांनी हैदोस घालीत दुकानातील साहित्याची फेकाफेक केली. या घटनेची माहिती मिळताच खदान पोलिसांनी तात्काळ दाखल होत फरार झालेल्या तृतीयपंथीयांचा शोध सुरू केला. हे तृतीयपंथी बनावट असल्याची माहिती आहे.