अमरावती : मध्य रेल्वेच्‍या भुसावळ विभागाने ३० नोव्हेंबर २०२३ पर्यंत तब्बल ४९.२० कोटी रुपयांचे उत्‍पन्न भंगार विक्रीतून मिळवले आहे. उद्दिष्टाच्या तुलनेने लक्षणीय वाढ नोंदविण्यात आली आहे. मध्य रेल्वेच्या सर्व विभागाच्‍या उत्‍पन्‍नात वाढ झाली असून ‘शून्य भंगार’ उपक्रमास गती मिळाली आहे. भंगारातून उत्पन्न मिळवण्याच्या मध्य रेल्वेच्या प्रयत्नांना प्रभावी यश मिळाले आहे. मध्य रेल्वेने वयोमर्यादा पूर्ण झालेली रेल्वे इंजिन्स, अतिरिक्त डिझेल इंजिन्स, वापरात नसलेले रेल्वे रूळ आणि वयोमर्यादा पूर्ण झालेली अपघाती इंजिन्स / रेल्वे डब्बे यांसह विविध प्रकारचे भंगार वर्गीकरण आणि त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत.

हेही वाचा : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर आता अजित पवारांचेही नागपुरात कार्यालय

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यामुळे त्या भंगाराचे उत्पन्नात रूपांतर झाले आहे. प्रत्येक विभाग, कार्यशाळा आणि शेड विहित वेळेत भंगार साहित्यापासून पूर्णपणे मुक्त करणे हा या उपक्रमाचा भाग आहे. मध्य रेल्वेच्‍या भुसावळ विभागात नोव्हेंबर २०२३ पर्यंत ७,९९४ दशलक्ष भंगार विक्री झाली आहे. चालू आर्थिक वर्षात भुसावळ विभागाला ४९.२० कोटी तर भुसावळच्या इलेक्ट्रिक लोको शेडमधून २३.६७ कोटी रुपयांचे उत्‍पन्‍न मिळाले आहे.