अमरावती : मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाने इतर रेल्वे कर्मचाऱ्यांच्या समन्वयातून एप्रिल ते नोव्‍हेंबर २०२३ या कालावधीत पळून गेलेल्‍या, हरविलेल्‍या ८५८ मुलांची सुटका केली आहे. त्यामध्ये ५९१ मुले आणि २६७ मुलींचा समावेश आहे. या मोहिमेसाठी ‘आरपीएफ’ला ‘चाईल्डलाईन’सारख्या स्वयंसेवी संस्थेची मदत झाली आहे. मुंबई विभागातून २५२ मुले , भुसावळ विभागातून २३८, पुणे विभागातून २०६, नागपूर विभागातून १११ आणि सोलापूर विभागातून ५१ मुलांची सुटका करण्यात आली आहे.

हेही वाचा : बुलढाणा जिल्हा हादरला! प्रेमी युगुलापाठोपाठ प्रियकराच्या वडिलांची आत्महत्या; साखर खेर्ड्यातच घेतला गळफास

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुरक्षा बलाकडे रेल्वे मालमत्ता, प्रवासी क्षेत्र आणि प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’अंतर्गत हरवलेल्या आणि घरातून पळून आलेल्या मुलांच्या सुटकेसाठी इतर यंत्रणा आणि संस्थांच्या मदतीने रेल्‍वे सुरक्षा बल काम करत आहे. रेल्‍वे सुरक्षा बलाने गेल्‍या आठ महिन्यांत मध्य रेल्वेवरील स्थानक आणि फलाटांवरील मुलांची सुटका केली आहे. अनेक मुले कौटुंबिक कलह, भांडण, तसेच चांगल्या आयुष्याच्या शोधात कुटुंबीयांना न सांगता शहरांकडे धाव घेतात. मध्‍य रेल्‍वेच्‍या अनेक रेल्वेस्थानकांवर ही मुले ‘आरपीएफ’ला सापडत असतात.