बुलढाणा : दूरवरच्या पुणे येथून देशी कट्टे खरेदीसाठी आलेल्या दोघांसह चौघांना देशी कट्टा व ७ जिवंत काडतुससह रंगेहात पकडण्यात आले. कारवाईत बारा लाखांची महागडी चारचाकी जप्त करण्यात आली. मध्यप्रदेशच्या सीमेला लागून असलेल्या जळगाव जामोद ( जि. बुलढाणा) नजीकच्या गोराळा धरण परिसरात स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. देशी कट्यांची खरेदी-विक्री करणाऱ्या चौघांना पथकाने अटक केली. मात्र चारजण घटनास्थळावरून पसार होण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी देशी कट्यासह ७ जिवंत काडतूस, बारा लाखांची इनोव्हा कार, ५ दुचाकी, ५ मोबाईल असा १४ लाखांचा मुद्धे माल जप्त केला.

हेही वाचा : गोंदिया : तुळशी विवाह साहित्य खरेदीसाठी बाजारात लगबग; शहरात उसाची दुकाने थाटली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अकोला येथील मध्यस्थामार्फत पुणे येथील दोघे कट्टा खरेदीसाठी आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. पथकाने मोहम्मद अख्तर शेख मुश्ताक (वाशिम बायपास , अकोला), फहदखान फारुखखान (भवानीपेठ, पुणे), तौसिफ करीमखान ( रविवार पेठ पुणे), रामसिंग भवानसिंग मुझाल्दा ( निमखेडी, तालुका जळगाव जामोद) यांना अटक केली. इतर चारजण घटनास्थळावरून पसार झाले. पोलिसांनी आरोपींकडून एक देशी कट्टा किंमत ३० हजार, ७ जिवंत काडतूस किंमत ३ हजार ५०० रुपये, कार किंमत १२ लाख व इतर साहित्य असा १४ लाखांचा हजार मुद्धे माल जप्त केला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली विलास सानप, दीपक लेकुरवाळे, गणेश पाटील, पुरुषोत्तम आघाव, गजानन गोरले, राजू आडवे यांनी कारवाई केली.