बुलढाणा : बुलढाणा लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर झालेल्या सभेत मोठा राजकीय गौप्यस्फोट केला. यामुळे सभेला उपस्थित राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांच्यासह उपस्थित महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी यांना मोठा धक्का बसल्याचे दिसून आले. खेडेकर यांनी मुख्य नेत्यांच्या भाषणापूर्वी आपल्या भाषणातून एकनाथ खडसे यांच्याबाबतीत खळबळजनक गौप्यस्फोट केला. त्यापूर्वी त्यांनी प्रामुख्याने रोहित पवार यांचे लक्ष वेधले.

हेही वाचा ; “देवेंद्र फडणवीस माझे चांगले मित्र, आम्ही एकमेकांना पक्षातील…”, नाना पटोलेंचे वक्तव्य; म्हणाले, “वंचितकडून सातत्याने…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खेडेकर म्हणाले की, आज आयोजित सभेचे निमंत्रण देण्यासाठी खडसे यांच्याकडे गेलो होतो. यावेळी या ज्येष्ठ नेत्याने जे काही सांगितले ते ऐकून अंगावर काटा आला. भाजपकडून गेल्या काही दिवसांपासून टोकाचा त्रास दिला जातोय. त्यामुळे ते येत्या पाच-सहा दिवसात भाजपमध्ये प्रवेश करतील, असा दावा खेडेकर यांनी केला. खडसे आपल्या आमदारकीचा राजीनामा देतील असे सांगून त्या जागी रोहिणी खडसे यांना विधान परिषदेच्या जागेचेदेखील आमिष दाखवण्यात आल्याचे खडसे यांनी आपल्याला सांगितले. हा गौप्यस्फोट ऐकल्यावर सभास्थळी काही क्षण सामसूम पसरली होती.