गडचिरोली : जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याने प्रचंड नुकसान झाले. धानाला योग्य दर मिळत नाही. आरोग्य, शिक्षणाचा प्रश्न गंभीर आहे. अशा परिस्थितीत वाढदिवशी गौतमी पाटीलची लावणी आयोजित करणे कितपत योग्य आहे, असा सवाल आमदार डॉ. देवराव होळी यांना समाज माध्यमावरून विचारला जात आहे. १० डिसेंबरला आ. होळी यांच्या वाढदिवसानिमित्त चामोर्शी येथे गौतमी पाटीलचा लावणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावरून समाज माध्यमांवर तरुणांनी होळींना चांगलेच सुनावले आहे.

हेही वाचा : “नको, नको…मंदिरात राजकीय प्रश्न नको!”, नवाब मलिकांच्या प्रश्नावर फडणवीसांची प्रतिक्रिया

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी नेहमीच वाद ओढवून घेणारे गडचिरोली येथील भाजपचे आमदार डॉ. देवराव होळी हे पुन्हा ‘ट्रोल’ होत आहेत. यावेळी त्यांच्या समर्थकांनी वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित केल्याने तरुणांनी त्यांना धारेवर धरत काही प्रश्न विचारले आहेत. चंद्रकांत नावाच्या तरुणाने हे प्रश्न विचारले असून त्यापाठोपाठ अनेकांनी त्याचे समर्थन केले आहे. तो म्हणतो, जिल्ह्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्याचे नुकसान झाले. धानाला योग्य मोबदला नाही. आरोग्य व शिक्षणाचा प्रश्न गंभीर आहे. त्याबाबत पाठपुरावा करा. पण हे सर्व सोडून तुम्ही गडचिरोली सारख्या मागास जिल्ह्यात गौतमीचा नाच ठेवला. त्यापेक्षा हाच पैसा येथील आदिवासी मुलांना स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण देण्यासाठी खर्च केला असता तर अनेकांना मार्गदर्शन मिळाले असते.