गोंदिया : एकेकाळी पूर्व विदर्भातील गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर हे जिल्हे अतिसंवेदनशील नक्षलवादग्रस्त जिल्हे म्हणून ओळखले जात होते. त्यावेळी मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र येथील लोक येथे यायला घाबरत होते. गोंदिया जिल्ह्यातील नक्षलवाद संपला नाही तर आमच्या सरकारने संपवला आहे, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे व्यक्त केला.

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या पायाभरणी सोहळ्याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. पूर्वी गोंदिया आणि गडचिरोली या दोन्ही जिल्ह्यांची ओळख नक्षलवादग्रस्त जिल्हे म्हणून होती. आमच्या सरकारने गोंदिया जिल्ह्यातून नक्षलवाद संपवला. प्रसंगी मला गडचिरोली जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदीसुद्धा काही काळापर्यंत रहावे लागले होते. कालांतराने सरकार व पोलिसांचा धाक निर्माण करण्याचे काम आम्ही केले, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

Controversial statements of Deputy Chief Minister Ajit Pawar again
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुन्हा वादग्रस्त वक्तव्ये; तीव्र प्रतिक्रिया उमटताच सारवासारव
Vijay Shivtare On Baramati Lok Sabha Election 2024
विजय शिवतारे यांचा उपमुख्यमंत्री अजित पवारांना शब्द; म्हणाले, “बारामतीच्या विजयामध्ये पुरंदरचा सिंहाचा वाटा असेल”
Brand Thackeray
ब्रँड ठाकरे, एकटा लढतो विचारे… उठा माझ्या सैनिकांनो पेटवा मशाली… ठाण्यासाठी रॅप गाणे
Nominate BJP for Dharashiv Delegation demands to Devendra Fadnavis
धाराशिवसाठी भाजपालाच उमेदवारी द्या! शिष्टमंडळाची फडणवीस यांच्याकडे मागणी

हेही वाचा : खळबळजनक! शाळेच्या छतावर मृत अर्भक, मांसाचे तुकडे आढळले

गोंदिया नगर परिषद भवनसाठी ३० कोटी – मुख्यमंत्री

दरम्यान, धोटे बंधू विज्ञान महाविद्यालय परिसरात स्व. मनोहरभाई पटेल यांच्या ११८ व्या जयंतीनिमित्त आयोजित सुवर्ण पदक वितरण समारंभात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोंदिया नगर परिषद भवनसाठी ३० कोटी रुपयाचा निधी देण्याची घोषणा केली. शिक्षण, सिंचन, उद्योग आदींच्या माध्यमातून गोंदियाचे सुपूत्र मनोहरभाई पटेल यांनी पश्चिम विदर्भाच्या विकासात मोलाचे योगदान दिले. नगर परिषदेपासून विधिमंडळाचे सदस्य आणि संसद सदस्य म्हणून त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. गोंदिया नगर परिषदेच्या माध्यमातून त्यांनी भरीव कार्य केले आहे. या नगर परिषदेचे सुसज्ज भवन निर्माण करण्यासाठी राज्य शासन ३० कोटींचा निधी देईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.