गोंदिया : गोंदिया विधानसभा मतदारसंघात उमेदवार व त्यांच्या समर्थकाच्या प्रचाराची पातळी खालावली आहे.उमेदवारांनी परस्परांवर आरोपांची चिखलफेक सुरू केली आहे. महाविकास आघाडीकडून महायुतीचे उमेदवार विनोद अग्रवाल यांना “कंत्राटदार” म्हणून संबोधले जात आहे. तर महायुतीकडून महाविकास आघाडीच्या उमेदवार गोपालदास अग्रवाल यांना “भूमिपूजन दास” संबोधले जात आहे.

गोंदियाच्या लढतीकडे जिल्हयाचे लक्ष लागले आहे. दोन्ही उमेदवारांनी निवडणूक जिंकण्यासाठी सर्वशक्ती पणाला लावली आहे. दोन्ही उमेदवारांचे समर्थक कार्यकर्ते मैदानात उतरुन जशाला तसे उत्तर देत अरे ला.. का रे…ने उत्तर देत आहे. यामुळे वातावरण गढूळ झाले आहे. उमेदवारांच्या कुटुबानांही प्रचारात ओढून त्यांच्यावर आरोप केले जात आहेत. महायुतीच्या उमेदवाराने एका सभेत आघाडीच्या उमेदवाराला ‘भूमिपूजनदास असे संबोधून विकासाच्या बाबतीत खुल्या चर्चेचे आवाहन दिले आहे. तर दुसरीकडे ५ वर्षापूर्वीचे विकास आणि गेल्या ५ वर्षात रखडलेल्या विकासकामांचा आढावा मांडत महाविकास आघाडीचे उमेदवार व त्यांच्या समर्थकांकडून महायुतीच्या उमेदवाराला चक्क कंत्राटदार म्हणून संबोधले आहे. गोंदिया विधानसभा मतदारसंघात उतरलेल्या मल्लांनी व त्यांच्या समर्थकांनी प्रचाराची अत्यंत खालची पातळी गाठली आहे.

हेही वाचा…ओडिशातील ‘मेलेनिस्टिक’ वाघांसोबत महाराष्ट्रातील वाघिणीचा संचार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खासदार प्रफुल पटेलांची आमदाराला धमकी

लोकसभा निवडणुकीतील पराभवाच्या धसका घेत खासदार प्रफुल्ल पटेल गेल्या एका आठवड्यापासून गोंदिया जिल्ह्यात प्रचाराकरिता ठाण मांडून बसले आहेत दरम्यान अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघातील पक्षाचे उमेदवार राजकुमार बडोले यांच्या प्रचार सभेत त्यांनी विद्यमान आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांना धमकी दिली. या बाबीच्या उल्लेख आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी रविवारी आमदार बच्चू कडू यांच्या प्रचार सभेदरम्यान बोलताना केला . यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चू कडू यांनी सुध्दा खासदार पटेल यांची लायकी काढली. खबरदार माझ्या उमेदवाराला यापुढे धमकी दिली तर प्रहारचे कार्यकर्ते तुमच्या घरावर चालून गेल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा दिला.