नागपूर : देशात कोळशावर आधारित औष्णिक आणि आण्विक वीजनिर्मितीने निश्चित लक्ष्य गाठले असले तरी जलविद्युत निर्मिती मात्र कमी झाली आहे. केंद्रीय विद्युत प्राधिकरणाच्या गेल्या नऊ महिन्यांच्या अहवालातून ही माहिती पुढे आली आहे. केंद्रीय विद्युत प्राधिकरणाच्या एप्रिल २०२३ ते डिसेंबर २०२३ दरम्यानच्या अहवालानुसार, देशात औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पांसाठी वरील कालावधीत ९ लाख ८३ हजार ४८ दशलक्ष युनिट वीजनिर्मितीचे लक्ष्य दिले होते. परंतु ९ लाख ८० हजार ५३८.२३ दशलक्ष युनिट वीज निर्माण झाली. ही लक्ष्याच्या तुलनेत ९९.७४ टक्के होती. गेल्यावर्षी या काळात देशात ८ लाख ९२ हजार ८९.६६ दशलक्ष युनिट वीज निर्माण झाली.

हेही वाचा : नागपुरात करोनाची नवीन लाट ओसरतेय! आता केवळ इतकेच रुग्ण

आण्विक वीजनिर्मिती प्रकल्पात गेल्यावर्षी वरील कालावधीसाठी ३४ हजार ५३४ दशलक्ष युनिट वीजनिर्मितीचे लक्ष्य होते. प्रत्यक्षात त्याहून जास्त ३६ हजार २२५.९० दशलक्ष युनिट वीज निर्माण झाली. ती लक्ष्याच्या तुलनेत १०४.९० टक्के होती. गेल्यावर्षी या काळात ३३ हजार ९२०.०२ दशलक्ष युनिट वीज निर्माण झाली. दरम्यान जलविद्युत प्रकल्पात १ लाख ३१ हजार ८०८ दशलक्ष युनिट वीजनिर्मितीचे लक्ष्य होते. परंतु प्रत्यक्षात १ लाख १५ हजार ३६.२८ दशलक्ष युनिट वीज निर्माण झाली. ही निश्चित लक्ष्याच्या तुलनेत ८७.२८ टक्के होती. गेल्यावर्षी वरील काळात देशात १ लाख ३७ हजार ९०३.६१ दशलक्ष युनिट वीज निर्माण झाली होती.

हेही वाचा : नागपूर : आरटीओ अधिकारी गोळीबार प्रकरण गुन्हे शाखेकडे; गायकवाड, शेजवळसह सगळ्यांचे जबाब नोंदवणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भूतानकडून आयात कमी

भारतात एप्रिल २०२३ ते डिसेंबर २०२३ दरम्यान भूतानकडून ६ हजार ७०२ दशलक्ष युनिट वीज आयात करण्याचे लक्ष्य होते. प्रत्यक्षात ४ हजार ७१३.५४ दशलक्ष युनिट वीज आयात झाली. ही लक्ष्याच्या तुलनेत ७०.३३ टक्के होती. गेल्यावर्षी भूतानकडून या काळात ६ हजार ६५३.२० दशलक्ष युनिट वीज आयात झाली होती. “केंद्र व राज्य सरकारच्या यशस्वी प्रयत्नाने देशात औष्णिक व अण्विक वीजनिर्मिती निश्चित लक्ष्याहून जास्त झाल्याचे केंद्रीय विद्युत प्राधिकरणाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. यंदा देशाच्या काही भागात पाऊस कमी पडल्याने जलविद्युत वीजनिर्मिती कमी झाली.” – यशवंत मोहिते, मुख्य जनसंपर्क अधिकारी, महानिर्मिती.