नागपूर : सरकारने कांदा, इथेनॉलता प्राधान्य द्यायचे ठरवले आहे. या मुद्यावर केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा आणि संबंधित मंत्र्यांशी आम्हाला भेट घ्यावी लागणार आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानभवन परिसरात पत्रकारांशी बोलताना सांगितले. मंत्रिमंडळ विस्तार हा मुद्दा मुख्यमंत्रीस्तराचा आहे. ते त्याबाबत निर्णय घेतील, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

राज्यातील सर्व पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यांमध्ये जाऊन पीकपाहणी केली आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून जतदगतीने पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कापूस, धान, तूर पिकांच्या नुकसानीचे आकडे पंचनामे पूर्ण केल्याशिवाय कळणार नाही. त्यामुळे पंचनामे झाल्यानंतरच शेतकऱ्यांना मदतीचा निर्णय घेतला जाईल, असे उपमुख्मयंत्री पवार यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : उपराजधानीत वाढल्या पिस्तूलधारी टोळ्या! गोरेवाड्यात काडतूस…

राज्यात सध्या कांदा निर्यातबंदी आणि इथेनॉलचा मुद्दा पेटलेला आहे. यावर बोलताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, “कांदाप्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांची भेट घेतली. इथेनॉलसंदर्भात मी स्वत: काल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भेटलो. आता हा प्रश्न दिल्लीस्तरावर असल्याने केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा आणि संबंधित मंत्र्यांशी भेट घ्यावी लागणार आहे. त्यानुसार, सभागृह सुरू असल्याने मुख्यमंत्र्यांच्या कानावर विषय टाकून आम्ही दिल्लीला जाऊ आणि यावर तोडगा काढू.’’

हेही वाचा : अकोला : युवती व महिलांचे बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले; अनैतिक मानवी वाहतूक कक्षाकडून…

पुरवणी मागण्यांमध्ये ४० हजार कोटींचा निधी सत्ताधारी आमदारांना दिल्याची टीका विरोधीपक्ष करत आहेत. ती टीका तथ्यहीन असल्याचेही उपमुख्यमंत्री पवार म्हणाले. अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान पाहता शेतकऱ्यांना मदत, कांदाप्रश्न आणि इथेनॉलचा मुद्दा महत्त्वाचा आहे. याला सरकारचेही प्राधान्य आहे. तसेच मंत्रिमंडळ विस्ताराचा संपूर्ण अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे. त्यावर ते जेव्हा निर्णय घेतील तेव्हा विस्तार होईल, असे उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देणार

मराठा समाजाला कायद्याच्या व नियमांच्या चौकटीत असलेले आणि टिकणारे आरक्षण देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यानुसार मराठा समाजाला कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता टिकणारे आरक्षण देऊ, अशी ग्वाहीही उपमुख्यमंत्री पवार यांनी दिली.