नागपूर : कर्जमाफीबाबत बच्चू कडूंची भूमिका दूटप्पीपणाची आहे, अशी टीका महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात माध्यमांशी बोलताना केली. बावनकुळे म्हणाले, मी आणि आमचे इतर मंत्री साडेचार तास मंत्रालयात बसलो आणि एकेक प्रश्नावर मार्ग काढला. विधानसभा अधिवेशन काळात सरकार समिती जाहीर करणार आहे. महाराष्ट्राचा दौरा करून ही समिती कर्जमाफी ज्यांना पाहिजे त्यांचे कर्ज माफी करणार. मी बच्चू कडूंना लेखी दिला आहे की, आपल्याला कर्जमाफी करायची आहे, आमचाही अजेंडा आहे. आम्ही निवडणुकीच्या काळात संकल्प केला आहे. सरकारने कबूल केले आहे. असे बावनकुळे म्हणाले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आर्थिक असमानतेकडे अलीकडे एका कार्यक्रमात लक्ष वेधले होते. त्याबाबत बावनकुळे म्हणाले, काही ठिकाणी आर्थिक दुर्बल व्यक्तीं आहेत. त्यांच्या पर्यंतना सरकार पोहोचायला पाहिजे. तिथे पोहोचत नाही, काही गोष्टी कमी पडत आहेत, मोदींनी सर्वांसाठी घर योजना केली. ही योजना सर्वांपर्यंत पोहोचले पाहिजे यासाठी काम करणे जरुरी आहे, आम्ही यावर सरकार आणि पार्टी म्हणून काम करतो आहे, एकही व्यक्ती कुठल्या योजनेपासून वंचित राहू नये खास करून महसूल विभागाने पुढाकार घेतला आहे आम्ही चांगल्या पद्धतीने काम करतो आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पावसाने शेतकरी समाधानी

पीक पाण्यासाठी आवश्यक असलेला पाऊस पडतोय, आतापर्यंत विदर्भ मराठवाडा किंवा महाराष्ट्रात पावसाने नुकसान होईल अशी परिस्थिती नाही जर काही नुकसान झाले तर सरकार मदत करते. खते तुटवडा – बी बियाणांच्या साठा आहे, अमरावती भंडारा चेक केला, काही लोक कृत्रिम तुटवडा निर्माण करीत आहे, काही ठिकाणी पुरवठा कमी आहे, पण सरकार तो पूर्ण करण्याकरगता काम करत आहे , असे बावनकुळे म्हणाले.