नागपूर : मुंबईतील घाटकोपर मध्ये होर्डिंग्ज कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर नागपूर शहरात मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेल्या मोठ्या अवैध होर्डिंग्ज मुद्दा ऐरणीवर आला आहे. घाटकोपरसारखी घटना घडू नये म्हणून सर्व मोठे होर्डिंगज तात्काळ हटवण्याची मागणी भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेससह विविध सामाजिक संघटनाच्यावतीने महापालिकेकडे करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसात नागपूर शहरातील विविध भागात होर्डिंगचा सुळसुळाट झाला आहे. वादळांमुळे ते कोसळण्याची शक्यता आहे. ही घटना होऊ नये यासाठी आता भारतीय जनता पक्षाचे नेते व महापालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके यांनी शहरातील अनधिकृत होर्डिंग्ज तात्काळ हटवण्यात यावे अशी मागणी महापालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे केली आहे.

हेही वाचा : अक्षय्य तृतीयेनंतर सोन्याच्या दरात मोठी घसरण, हे आहेत आजचे दर…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) दक्षिण पश्चिमतर्फे शहरातील मोठे होर्डींग तात्काळ हटविण्याची मागणी आयुक्ताकडे केली आहे. अवकाळी पाऊस आणि वादळी वारा आल्यावर नागपुरात घाटकोपरच्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये. त्यामुळे मोठे होर्डींग तात्काळ हटवावे अशी मागणी प्रदेश सरचिटणीस दिलीप पनकुले यांच्यासह पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केली.