नागपूर : व्यवसायिक असल्याची बतावणी करून एका बेरोजगार युवकाने उच्चशिक्षित युवतीशी लग्न केले. मात्र, लग्नानंतर पती बेरोजगार असल्याचे कळले. लग्नानंतर विकृत असलेला पती हा नवविवाहितेवर नेहमी अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करून छळ करायला लागला. लग्नाच्या दोन महिन्यातच दोघांचा संसार तुटला. पत्नीच्या तक्रारीवरून पतीसह कुटुंबियांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

नीरज (२६, रा. काटोल रोड, गिट्टीखदान) आणि रेशमा (बदललेले नाव) यांचे ३० जानेवारीला थाटात लग्न झाले. पीडित नवविवाहिता रेशमीचे पदव्यत्तरपर्यंत शिक्षण झाले आहे. रेशमाला मागणी घालायसाठी आलेल्या नीरजने मोठा व्यवसायिक असल्याचे सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवून रेशमाच्या कुटुंबियांनी लग्नास होकार दिला. लग्नानंतर मात्र, नीरज कुठलाच कामधंदा करीत नसल्याचे उघड झाले. सतत तिला शारीरिक, मानसिक त्रास द्यायचा. सासू-सासरे माहेरून ५० हजाराची मागणी करायचे.

हेही वाचा : लग्नाच्या वरातीत आक्षेपार्ह गाणे; दोन गट भिडले, तिघे जखमी, चार ताब्यात

पती क्षुल्लक कारणावरुन मारहाण करायचा. सतत शिवीगाळ करीत होता. लग्नानंतर तो केवळ नवविवाहितेवर वारंवार अनैर्गिक अत्याचार करीत होता. त्यामुळे त्याच्या नेहमीच्या त्रासाला कंटाळली होती. तिने सासू-सासऱ्यांना पतीच्या लैंगिक विकृतीबाबत सांगितले. तेव्हापासून सासरासुद्धा तिच्याकडे वाईट नजरेने बघायला लागला. तसेच तिच्याशी अश्लील शब्दात बोलून तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करीत होता. हा सर्व प्रकार सहन होत नसल्यामुळे तिने सासऱ्याच्या चाळ्याबाबत पतीशी चर्चा केली.

हेही वाचा : ३६ दिवस जागते रहो…! शासकीय गोदामात ‘ईव्हीएम’ कडेकोट बंदोबस्तात राहणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मात्र, त्यानेही अ‍ॅसिड टाकून चेहरा विद्रृप करण्याची तसेच माहेरच्यांना मारण्याची धमकी देत गप्प सहन करण्यास भाग पाडले. पीडितेच्या स्वातंत्र्यावर बंधने घातल्याने ती अस्वस्थ झाली. ३० जानेवारी ते १० एप्रिल या ७० दिवसांत नवविवाहितेचा अतोनात छळ केला. अखेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. नवविवाहितेच्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी पती, सासू आणि सासऱ्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.