नागपूर : मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सुखकर प्रवासासाठी वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये नाविन्यपूर्ण योजना राबविण्यासाठी पाऊल टाकले आहे. एक्झिक्युटिव्ह कोचमधील शौचालयांसाठी गंध सेन्सर्स बसवण्यात आले आहे. स्वच्छतेच्या दृष्टीने आणि प्रवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागू नये म्हणून मध्य रेल्वेने वंदे भारत एक्स्प्रेसच्या एक्झिक्युटिव्ह कोचच्या शौचालयांमध्ये गंध सेन्सर्स सुरू केले आहेत. हे सेन्सर्स चाचणीच्या आधारावर लावण्यात आले आहेत आणि शौचालयाच्या वातावरणातील सततच्या गंध पातळीचे परिक्षण करण्यासाठी डिझाइन केलेले आहेत. वासाच्या तीव्रतेत वाढ झाल्याचे आढळून आल्यावर सेन्सर्स तत्काळ हाऊसकीपिंग कर्मचार्‍यांना संदेश देईल.

हेही वाचा : योजनेच्या मान्यतेसाठी मंत्र्यांना सचिवाच्या दारात जावे लागणार; महाज्योतीकडून ‘या’ योजनेच्या जागांमध्ये वाढ, मात्र…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानामुळे कर्मचाऱ्यांना एखाद्या डब्यातून माहिती प्राप्त झाल्यास तेथे त्वरित पोहचण्यास मदत होते. स्वच्छता मानके सुस्थितीत राखण्यासाठी आणि प्रवाशांची गैरसोय कमी करण्यासाठी ही योजना जलद कारवाई होण्यासाठी मदत करते. चाचणीच्या यशस्वी कालावधीनंतर, हे गंध सेन्सर्स इतर सर्व गाड्यांच्या डब्यांमध्ये हळूहळू बसविण्यात येणार आहेत, ज्यामुळे संपूर्ण ट्रेनमध्ये प्रवाशांच्या स्वच्छ, सुगंधीत व सुखकर प्रवासासाठी मदत होईल.