नागपूर : उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करावी तेवढी त्यांची उंची आणि पात्रता नाही. गेल्या काही दिवसांत त्यांचे मानसिक स्वास्थ्य बिघडले असून त्यांच्या प्रकृतीची अधिकच काळजी वाटू लागली आहे. त्यांची सध्या झालेली ही अवस्था ती त्यांनी स्वतःच्या हाताने करवून घेतली आहे. ‘असंगाशी संग’ केल्यानंतर असेच होणार, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. गाव चलो अभियानाच्या माध्यमातून कामठी तालुक्यात वडोडा या गावात चंद्रशेखर बावनकुळे कार्यकर्त्यांशी व गावातील नागरिकांशी संवाद साधणार असून त्या ठिकाणी मुक्काम करणार आहे.

यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना बावनकुळे म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेतील केलेली विधाने बघता त्यांचे मानसिक स्वास्थ्य बिघडले असून त्यांना आता खरंच उपचालांडल्या असून त्यांच्याबद्दल राची गरज आहे. त्यांची विधाने ऐकल्यानंतर ते सध्या प्रचंड मानसिक तणावात आहात, हे लक्षात येते. फडणवीस यांच्यावर टीका करताना त्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या असून त्यांची कीव वाटू लागली. राजकारणात आपल्या विरोधकांवर टीका करायची असते. पण ती करताना सभ्यता, संस्कृती पाळावी लागते मात्र उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत असल्यामुळे सभ्यता राहिलेली नाही. देवेंद्र फडणवीस यांच्यावर ज्या खालच्या भाषेत टीका करत आहे ती पातळी आम्हाला गाठता येणार नाही. कारण आम्ही सभ्यता आणि संस्कृती पाळणारे आहे. पण त्यांची भाषा, टोमणे यातून त्यांना नैराश्य आले आहे. या बिकट मनोवस्थेतून त्यांनी लवकर बाहेर पडावेत, एवढीच प्रार्थना करणे आमच्या हातात असल्याची उपरोधीक टीका बावनकुळे यांनी केली.

kerala politics rahul gandhi
“राहुल गांधींचा ‘डीएनए’ तपासायला हवा, ते गांधी असण्याबद्दल संशय”, केरळमधील नेत्याची टीका
BSP turned Congress leader Kunwar Danish Ali
पंतप्रधान मोदींचा हल्ला दानिश अलींसाठी कौतुकाचा विषय, काय म्हणाले अली?
different move in alliance has increased uneasiness in the Shinde Sena
मित्रपक्षाच्या ‘रसदी’मुळे शिंदे सेनेत अस्वस्थता
Uneasiness in Congress as Priyanka Gandhi is not getting a meeting
चंद्रपूर : प्रियंका गांधींची सभा मिळत नसल्याने काँग्रेसमध्ये अस्वस्थता; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींची सभाही रद्द

हेही वाचा : “मुख्यमंत्री कार्यालय गुंडांना सुरक्षित वाटते काय?”, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल

देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीत खंजीर खुपसला तेव्हाच त्यांनी हक्क गमावला आहे. गेल्या काही दिवसांत त्यांच्याजवळ शिवसैनिक उरले नाही त्यामुळे ते वैफल्यग्रस्त होऊन असे वक्तव्य करत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर जिल्ह्यातील काटोल मतदारसंघांमध्ये जेव्हा मुक्कामी होते त्यावेळी त्यांच्या कार्यक्रमाला लोकांची गर्दी झाली आणि फडणवीस यांचे स्वागत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केले तर त्यांना पक्षातून काढून टाकले त्यामुळे येणाऱ्या काळात उद्धव ठाकरे यांच्या अवतीभोवती चार पाच माणसे राहतील अशी टीका बावनकुळे यांनी केली. नाना पटोले आज राष्ट्रपती राजवट लागू करा यासाठी राज्यपालांची भेट घेणार असले तरी तशी स्थिती महाराष्ट्रात नाही. जेव्हा पिशव्याचा घोटाळा झाला तेव्हाच राष्ट्रपती राजवट लागू करायला पाहिजे होती.

हेही वाचा : धक्कादायक! दलित मुलीवर प्रेम केल्याने वडिलांनी मुलाला संपवले; बनाव रचला, पण पोलीस तपासात…

पुण्यात जी घटना घडली ती घडायला नको होती. या घटनेमध्ये जे दोषी आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे पण, निखिल वागळे यांनी देखील बोलताना जरा ताळतम्य बाळगावे असेही बावनकुळे म्हणाले. निखिल वागळे एके वेळी पत्रकार होते. पण आता ते यु ट्यूबवरुन काहीही बोलत असतात. मराठा समाजाला आरक्षण देण्याची सरकारची तयारी आहे पण त्यासाठी कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही.