नागपूर : मेट्रोचा प्रवास सोपा व्हावा या करता आता एक महत्वाचे पाऊल महा मेट्रो,नागपूर महानगरपालिका आणि मिहान इंडिया लिमिटेडच्या संयुक्त विद्यमानाने एअरपोर्ट मेट्रो स्टेशन-विमानतळ-एयरपोर्ट मेट्रो स्टेशन दरम्यान नागपूर महानगरपालिकेच्या वातानुकूलित इलेक्ट्रिक शटल बस २ फेब्रुवारी पासून सुरु होणार आहे. नागपूर महानगरपालिकेतर्फे संचालित या वातानुकूलित इलेक्ट्रिक बसची आसन क्षमता ४५ असून याचे भाडे १२ रुपये एवढे असेल. सदर वातानुकूलित इलेक्ट्रिक शटल बस सकाळी ६ ते रात्री १० वाजतापर्यंत एयरपोर्ट मेट्रो स्टेशन आणि विमानतळ दरम्यान दर १५ मिनिटांनी उपलब्ध असेल. विमानतळाहुन मेट्रो स्टेशन कडे येताना किंवा मेट्रो स्टेशन येथून विमानतळाकडे जाताना प्रवाश्यांसोबत सामान असते. हे सामान घेऊन हे अंतर कापणे कठीण होते. ही सेवा सुरु झाल्यावर शटल बसच्या माध्यमाने सामान सोबत असताना देखील प्रवास सुकर होणार आहे.

हेही वाचा : ‘हनीट्रॅप’ प्रकरण : नागपुरातील काही पत्रकार पोलिसांच्या ‘रडार’वर!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जास्तीत जास्ती नागरिकांनी मेट्रोचा उपयोग करावा तसेच शेवटच्या घटका पर्यंत मेट्रो सेवा पोहोचावी असा महा मेट्रोचा मानस असून फर्स्ट आणि लास्ट माईल कनेक्टिव्हिटी अंतर्गत महा मेट्रोने नेहमीच अनेक उपाययोजना राबवल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून विमानतळ ते एयरपोर्ट मेट्रो स्टेशन दरम्यान फिडर सेवा. या सेवामुळे विमानतळ येथे जाणारे तसेच विमानतळ येथून शहराकडे येणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे. विमानतळ ते एयरपोर्ट मेट्रो स्टेशन दरम्यान शटल बस सेवा असावी अशी मागणी बऱ्याच कालावधीपासून नागरिकांची मागणी होती.