नागपूर : ड्रॅगन पॅलेस जवळची विपश्यना केंद्राची १० एकर जागा माजी मंत्री सुनील केदार यांनी हडपली, असा आरोप माजी राज्यमंत्री सुलेखा कुंभारे यांनी केला. महायुतीचे रामटेक लोकसभा मतदारसंघात उमेदवार राजू पारवे यांची प्रचार सभा कन्हान येथे आज आयोजित करण्यात आली. यावेळी त्या बोलत होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी सभास्थळी येण्यापूर्वी त्यांचे भाषण झाले.

हेही वाचा : नागपूर : विजेच्या धक्क्याने नऊ वर्षांचा मुलगा ठार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्या म्हणाल्या, केदार स्वतः जामिनावर आहेत. ते रश्मी बर्वे यांचे जातप्रमाण वैध करून आणू शकत नाही. हे मी आधीच रश्मी बर्वे यांना सांगितले होते. तरीपण त्या रामटेकमध्ये उमेदवार बनलेल्या आणि त्यांचे जातप्रमाण रद्द झाले, असेही त्या म्हणाल्या. यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले, अशोक चव्हाण, आमदार आशिष जयस्वाल, राजू पारवे, चंद्रशेखर बावनकुळे, जोगेंद्र कवाडे, टेकचंद सावरकर उपस्थित होते.