नागपूर : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. अंतिम आठवड्यातील प्रस्तावांवर चर्चा करताना विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या बाबतही भ्रष्टाचाराच्या तक्रारी आहेत,असा आरोप केला. पण यावेळी लोढा सभागृहात नव्हते. दानवे यांनी लोंढांचे नाव घेतले व नंतर मागे घेतले. पीठासीन अधिकाऱ्यांनी कामकाजातून ते काढून टाकले. पण काही वेळाने लोढा सभागृहात आले आणि थेट राजीनामा देण्याची तयारी दर्शवली. अखेर पीठासीन अधिकाऱ्यांनी तोडगा काढला. दानवे त्यांच्या आरोपांवर ठाम होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : “मोदी सरकार लोकशाहीचा खून करतंय”, खासदार निलंबनावरून नाना पटोले यांची टीका, म्हणाले…

अंबादास दानवे म्हणाले, “मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याबाबत अनेक तक्रारी आहेत. कुणाच्याही जमिनी घ्यायच्या. मुंबईत जमिनी, ठाणे, कल्याण, भिवंडीत जमिनी घेतल्या”, असं अंबादास दानवे म्हणाले. यानंतर लोढा यांचं नाव आपण मागे घेत असल्याचं दानवे म्हणाले. पण लोढा यांचं नाव न घेता, दानवे यांनी त्यांचा मुंबईचे पालकमंत्री असा उल्लेख करत, आरोपांच्या फैरी चालूच ठेवल्या. दानवेंच्या आरोपाने व्यथित झालेल्या लोढा यांनी थेट राजीनामा देण्याची तयारी दर्शविली. ते म्हणाले “मी १० वर्षांपासून मी माझ्या कुटुंबाच्या व्यवसायात नाही. एकही अनधिकृत बांधकाम केले नाही. आम्ही अनधिकृत व्यवसाय करत नाही.पदाचा मी गैरवापर करत नाही, चुकीचे झाले असेल तर मी कोऱ्या चिठ्ठीवर राजीनामा लिहून आणला आणला आहे तो आपल्याकडे पाठवतो” यावर नीलम गोऱ्हे यांनी “तुम्ही राजीनामा देऊ नका. अंबादास दानवे यांचे जे आरोप आहेत त्याबाबत ते संबंधित यंत्रणेला पुरावे सादर करतील”, असे सांगितले.

हेही वाचा : “पशूंची गणना केली जाते, मग जातिगत जनगणना का नाही?” बच्चू कडू यांचा संघ आणि भाजपला सवाल

मी पुरावे द्यायला तयार : अंबादास दानवे

लोढा यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवल्यावर दानवे यांनी निवेदन केले. माझ्याकडे आलेल्या तक्रारींची दखल घेऊन मी सभागृहात मुद्दे मांडले. मी पुरावे द्यायला तयार आहे, असे दानवे म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nagpur minister mangal prabhat lodha ready to resign in maharashtra legislative council cwb 76 css
First published on: 20-12-2023 at 13:25 IST