नागपूर : गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत रायफलची तब्बल १५७ काडतूस मिळाली, परंतु त्या काडतूसांचा वापर करण्यासाठी असलेल्या बंदुकांचे काय? असा प्रश्न समोर आला आहे. ऐन हिवाळी अधिवेशन काळात एवढा मोठा काडतूसांचा साठा सापडल्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात एकही वरिष्ठ पोलीस अधिकारी बोलण्यास तयार नसल्यामुळे मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.

नागपुरात विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन असल्यामुळे शहरात मुख्यमंत्र्यासह सर्वच मंत्रिमंडळ उपस्थित आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी तब्बल ११ हजार पोलीस कर्मचाऱ्यांचा ताफा तैनात आहे. कडेकोट बंदोबस्त असताना शहरातील गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोरेवाडा जंगल परीसरात नेचर पार्कजवळ एका ठिकाणी शनिवारी सकाळी ‘एसएलआर रायफल’ बंदुकीची १५७ काडतूस आढळली. मात्र, त्या काडतूसांचा वापर करण्यासाठा उपलब्ध असलेल्या बंदुकांचा शोध अद्याप लागलेला नाही. त्यामुळे अधिवेशन काळात काही घातपात घडविण्याचा कट होता का? असा संशय निर्माण झाला आहे.

हेही वाचा : अकोला : अवकाळीने सात तालुक्यात ६३ हजार ८६१ हेक्टरवरील शेती पिकांच्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यापूर्वी अधिवेशन काळात तत्कालीन महापौर जोशी यांच्यावर अंधाधुंद गोळीबार झाला होता. ते रसरंजन हॉटेलमध्ये कुटुंबासह छोटेखानी कार्यक्रम आटोपून घरी परतत असताना त्यांच्या कारवर दोन दुचाकीस्वारांनी गोळीबार करून पलायन केले होते. त्यामुळे अधिवेशन काळात नागपुरात पिस्तूलांचा वापर होणे नवीन नाही. त्यामुळेसुद्धा पोलिसांनी सतर्कता बाळगली असून बंदोबस्तात वाढ केली आहे.