नागपूर : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका बार आणि रेस्तराँमध्ये गोंधळ घालणाऱ्या गुन्हे शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्याला बारमारक आणि नोकरांनी बेदम चोपले. त्याच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. पोलिसांनी लगेच पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल केला. विजय गिरी असे वादग्रस्त आरोपी पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. आरोपी पोलीस कर्मचारी विजय गिरी हे गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकामध्ये (एनडीपीएस) कार्यरत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून गिरी हे वादग्रस्त असल्याची चर्चा होती. हिंगणा रोडवरील महेंद्रा कंपनीजवळ बालाजी बार आणि रेस्तराँ आहे. या बारमध्ये विजय गिरी नेहमी येऊन गोंधळ घालून ग्राहक आणि बारमालकाला दमदाटी करीत असल्याचा आरोप आहे.

हेही वाचा : संविधानात दुरूस्‍ती केल्‍याशिवाय ‘इंडिया’ हटवता येणार नाही

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास पोलीस कर्मचारी विजय गिरी हे त्यांच्या मित्रासह बारमध्ये आले. त्यांनी जेवनाची ऑर्डर दिली. परंतु, जेवन टेबलवर यायला उशिर लागला. त्यामुळे विजय गिरी यांनी पोलीस असल्याची बतावणी करून मालक व्यंकटेश पांडलवार यांना दमदाटी केली. आरडाओरड करून ग्राहकांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे चिडलेल्या व्यंकटेश पांडलवार आणि त्यांच्या नोकरांनी पोलीस कर्मचारी विजय गिरी यांना चांगला चोप दिला. विजय यांनीही हॉकी स्टिकने व्यंकटेश यांना मारहाण केली. एमआयडीसी पोलिसांनी एकमेकांच्या तक्रारीवरून व्यंकटेश पांडलवार आणि विजय गिरी दोघांवरही गुन्हे दाखल केले.