नागपूर : रेल्वेगाडी सुटण्यास अवघे काही मिनिटे असताना फलाट बदलण्यात आल्याने सोमवारी नागपूर रेल्वे स्थानकावर प्रवाशांची धावाधाव झाली. वयोवृद्ध प्रवाशांची दुसऱ्या फलाटावर घाईघाईने जाताना दमछाक झाली.

हेही वाचा… नागपूर : ‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या प्रियकराचा संशयास्पद मृत्यू

नागपूर – पुणे एक्सप्रेस (१२१३६) ही रेल्वेगाडी सायंकाळी ६ वाजता नागपूर येथून सुटते. ही गाडी नेहमी फलाट क्रमांक ४ वर निघते. आज देखील ही गाडी येखून निघणार असल्याची उद्घोषणा झाली. त्यामुळे प्रवासी त्या फलटावर एकत्र आले. पण सुटायला काही मिनिटे असताना फलाट क्रमांक ६ वरून सुटणार असल्याची उद्घोषणा झाली. त्यामुळे प्रवासी तिकडे निघेल. काही मिनिटानंतर परत गाडी फलाट क्रमांक ७ वरून निघणार असल्याचे उद्घोषणा झाली.

हेही वाचा… नागपूर : लग्नाला कुटुंबीयांनी केलेल्या विरोधामुळे प्रेमीयुगुलाचा आत्महत्येचा प्रयत्न

अशाप्रकारे ऐनवेळी फलाट बदलल्यामुळे प्रवाशांची धावाधाव झाली. याबाबत प्रवासी सुभाष चहांदे म्हणाले, या प्रकारामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. विशेष म्हणजे, ही रेल्वेगाडी १ तास ५ मिनिटे म्हणजे सायंकाळी सात वाजून पाच मिनिटांनी नागपूरहून सुटली.