scorecardresearch

Premium

केवळ १४ मिनिटांत बिलासपूर-नागपूर ‘वंदे भारत ट्रेन’ची स्वच्छता

भारतीय रेल्वेने देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी उभ्या असलेल्या वंदे भारत गाड्यांची एकाच वेळी प्रत्येकी १४ मिनिटांच्या विक्रमी वेळेत स्वच्छता केली.

bilaspur nagpur vande bharat express train, nagpur railway station, vande bharat express cleaned
केवळ १४ मिनिटांत बिलासपूर-नागपूर 'वंदे भारत'ची स्वच्छता (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

नागपूर : भारतीय रेल्वेने देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी उभ्या असलेल्या वंदे भारत गाड्यांची एकाच वेळी प्रत्येकी १४ मिनिटांच्या विक्रमी वेळेत स्वच्छता केली. मध्य रेल्वेने वंदे भारत एक्स्प्रेसच्या साफसफाईसाठी ही नवीन १४ मिनिटांची चमत्कार योजना १ ऑक्टोबर २०२३ पासून लागू केली. नागपूर स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक ८ वर बिलासपूर-नागपूर हि वंदे भारत ट्रेन आल्यानंतर सर्व प्रवासी उतरल्याची खात्री करण्यात आली.

हेही वाचा : गोंदिया : ९१५ गावांची नजर पैसेवारी ५० पैशाच्या वर, अतोनात नुकसान तरीही…

Konkan-railway
कोकण रेल्वेवर मेगाब्लॉक, पाच रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात बदल
special train on Mumbai to Nagpur route
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! या मार्गावर दोन दिवस धावणार विशेष गाडी
Four new police stations safety railway passengers mumbai
रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी चार नवीन पोलीस ठाणी
Kharpada and Kashedi
गणेश उत्सव २०२३ : कोकणात खारपाडा ते कशेडी मार्गावर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची जय्यत तयारी, प्रत्येक पाच किलोमीटरवर…

त्यानंतर १२.१५ वाजता साफसफाईची कारवाई सुरू झाली. रेल्वे कर्मचाऱ्यांनी अवघ्या १४ मिनिटांच्या विक्रमी वेळेत १२.२९ पर्यंत वंदे भारत ट्रेनची स्वच्छता पूर्ण केली. स्वच्छता मोहिमेत २५ सफाई कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला होता. स्वच्छतागृहे, रॅक, पटल, आसन, मजला आणि कोचच्या बाहेरील भागांसह आतील भागांची साफसफाई करण्यासाठी स्वच्छता कर्मचाऱ्यांचा चमू नेमण्यात आला होता.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In nagpur railway station bilaspur nagpur vande bharat express train cleaned within only 14 minutes rbt 74 css

First published on: 01-10-2023 at 18:17 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×