नागपूर : समृद्धी महामार्गावर १ जुलै २०२३ रोजी ट्रॅव्हल्स अपघतात २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मृतांच्या कुटुंबीयांना २५ लाख रुपयांची मदत घोषित केली होती. परंतु २०० दिवसानंतरही पूर्ण मदत मिळाली नसल्याचे सांगत अपघातग्रस्तांचे कुटुंबीय १९ जानेवारीला फडणवीसांच्या जनसंपर्क कार्यालयापुढे अकराशे वेळा राम नाम जप करणार आहेत.

याबाबत टिळक पत्रकार भवनातील पत्रकार परिषदेत चंद्रशेखर मडावी म्हणाले, नागपूरहून- पुण्याला निघालेल्या बसला सिंदखेडराजाजवळ हा अपघात झाला. त्यात सर्वाधिक मृत वर्धा जिल्ह्यातील होते. अपघातानंतर उपमुख्यमंत्री व वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री फडणवीस यांनी दगावलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २५ लाख रुपयांची मदतीची घोषणा केली. परंतु प्रत्यक्षात राज्य शासनाकडून ५ लाख व केंद्राकडून २ लाखांचीच मदत मिळाली.

हेही वाचा : नागपूर : पंतगांच्या नादात दोघे भाऊ पडले कालव्यात…

स्थानिक आमदार, खासदार, राज्यपालांची भेट घेत मदतीची मागणी केली. लोकप्रतिनिधींनी विधानसभा-लोकसभेत प्रश्न मांडला. परंतु पुढे काहीच झाले नाही. त्यामुळे वर्धेतील जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आंदोलन सुरू आहे. त्यानंतरही न्याय मिळत नसल्याने शेवटी प्रभू श्री राम यांच्याकडे साकडे घालण्याचे ठरवले. दरम्यान देवेंद्र फडणवीस राम भक्त आहेत. रामाचा जप त्यांना घोषणा पूर्ण करण्याची बुद्धी देईल. त्यासाठी फडणवीस यांच्या नागपुरातील जनसंपर्क कार्यालयापुढे १९ जानेवारी रोजी राम नाम जप करण्याचा निर्णय घेतला, असे मडावी यांनी सांगितले.

हेही वाचा : नागपूर : ‘मिशन युवा’ ची केंद्रीय निवडणूक आयोगाकडून दखल, जिल्हाधिकाऱ्यांना राष्ट्रीय पुरस्कार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या पत्रकार परिषदेला या अपघातात दगावलेल्या कुटुंबातील संजय गुप्ता, रसिका मार्कंडे, मदन वंजारी, कल्पना गुप्ता, परीजा मार्कंडे, निरू सोमकुवर, अझहर शेख, मीना वंजारी, ओम प्रकाश गांडोळे, दिनकर खेळकर, रामदास पोकळे, नीलिमा खोडे, नीलू तायडे, शंकर गोठे, अजय जानवे उपस्थित होते.