नागपूर: सोन्याच्या दरात चढ- उताराचा क्रम आताही कायम आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच सोन्याचे दर घसरले. परंतु काही दिवसांनी पुन्हा सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली होती. आता मागील तीन दिवसांमध्ये सोन्याचे दर पुन्हा उतरले आहे. त्यामुळे ग्राहकांना सोन्याचे दागिने खरेदीची संधी उपलब्ध झाली आहे. दिवाळीच्या सनासुदीत नागपुरसह राज्यभरात सोन्याचे दर चांगलेच उच्चांकीवर होते. त्यानंतही ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात सोने- चांदीच्या दागिन्यांची खरेदी केली होती. सनासुदीनंतर सोन्याच्या दरात प्रथम मोठी घसरण झाली. परंतु राज्यातील विधानसभा निवडणूकीदरम्यान पून्हा सोने- चांदीच्या दरात वाढ नोंदवली गेली. नागपुरातील सराफा बाजारत धनत्रयोदशीला (२९ ऑक्टोबर) बाजार उघडल्यावर सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७९ हजार २०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७३ हजार ७०० रुपये, १८ कॅरेटसाठी ६१ हजार ८०० रुपये, १४ कॅरेटसाठी ५१ हजार ५०० रुपये होते.

लक्ष्मीपूजनाला (१ नोव्हेंबर) दर वाढून २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७९ हजार ४०० रुपयेपर्यंत गेले. नागपुरात २९ नोव्हेंबरला बाजार उघडल्यावर सकाळी १०.३० वाजता सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७७ हजार रुपये, २२ कॅरेटसाठी ७१ हजार ६०० रुपये, १८ कॅरेटसाठी ६० हजार १०० रुपये, १४ कॅरेटसाठी ५० हजार १०० रुपये होते. हे दर तीन दिवसानंतर २ डिसेंबरला दुपारी २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७६ हजार १०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७० हजार ८०० रुपये, १८ कॅरेटसाठी ५९ हजार ४०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४९ हजार ५०० रुपये नोंदवले गेले. त्यामुळे नागपुरात २९ नोव्हेंबर २०२४ रोजीच्या तुलनेत २ डिसेंबर २०२४ रोजी सोन्याच्या दरात २४ कॅरेटमध्ये ९०० रुपये, २२ कॅरेटमध्ये ८०० रुपये, १८ कॅरेटमध्ये ८०० रुपये, १४ कॅरेटमध्ये ६०० रुपये प्रति दहा ग्राम अशी घट नोंदवण्यात आली. दरम्यान भविष्यात सोन्याच्या दरात आणखी मोठी वाढ होण्याची शक्यता नागपुरातील सराफा व्यवसायिकांकडून वर्तवली जात आहे. त्यामुळे आता ग्राहकांना सोने- चांदीच्या दागिन्यात गुंतवणुकीसाठी चांगली संधी असल्याचाही सराफा व्यवसायिकांचा दावा आहे.

हेही वाचा : Video: Tiger vs Tiger… ताडोबात छोटी ताराच्या दोन बछड्यांमधे जुंपली

चांदीच्या दरातही घसरण…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नागपुरातील सराफा बाजारात धनत्रयोदशीली (२९ ऑक्टोंबर) प्रति किलो चांदीचे दर ९८ हजार ८०० रुपये होते. हे दर २९ नोव्हेंबरला सकाळी बाजार उघडल्यावर ९० हजार ६०० रुपये प्रति किलो होते. हे दर सोमवारी (२ डिसेंबर) दुपारी ८९ हजार ३०० रुपये नोंदवण्यात आले. त्यामुळे नागपुरात चांदीच्या दरात मागील तीन दिवसांत १ हजार ३०० रुपयांची घट नोंदवली गेली.