नागपूर : काश्मीर संदर्भात केंद्र सरकारने घेतलेला कलम ३७० हटवण्याचा निर्णय आज सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. त्याचे स्वागत करताना उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाचे विधान केले. नागपूर विमानतळावर आले असता उद्धव ठाकरे म्हणाले, २०१९ मध्ये कलम ३७० हटविले तेव्हाही आम्ही या निर्णयाचे स्वागत केले होते. सप्टेंबर २०२४ पर्यंत काश्मीरमध्ये निवडणुका घेण्यासंदर्भातील आदेशही न्यायालयाने दिले आहेत, ते देखील लवकरात लवकर व्हावे, येथील नागरिकांना मोकळ्या वातावरणात मतदान करण्याचा अधिकार मिळावा, सोबतच पाकव्याप्त काश्मिरमध्ये देखील निवडणुका व्हाव्यात यामुळे संपूर्ण देशवासीयांना आनंद होईल असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

हेही वाचा : “लव्ह जिहादविरुद्धची समिती लोकांवर दबाव आणत आहे”, अबू आझमी यांचा आरोप; म्हणाले, “तातडीने रद्द करा…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काश्मिरी पंडिता संदर्भात बोलताना, सध्या ‘गॅरंटी’चा जमाना आहे, त्यामुळे काश्मिरी पंडितांची गॅरंटी कोण घेणार? असे म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. जे काश्मिरी पंडित आपले घर सोडून गेले होते त्यांना परत आणण्याची गॅरंटी कोण घेणार, देशात असा कोण आहे, जो निवडणुकीपूर्वी काश्मीरी पंडित परत येतील याची गॅरंटी घेणार, असे प्रश्नही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केले.