नागपूर : आमदार राजू पारवे यांनी कुही तालुक्यातील मांढळ येथे भराडी समाजातील गरीब बांधव आणि किन्ही येथील आई वडिलांचे छत्र हरविलेल्या पूजा व गौरव खंगार या मुलांच्या घरी जाऊन दिवाळी साजरी केली. उमरेड येथील काँग्रेस आमदार पारवे रविवारी (१२ नोव्हेंबर) रात्री कुही तालुक्यातील मांढळ येथे भराडी समाज बांधवांच्या वस्तीत पोहचले. त्यांनी दिवाळीनिमित्त वस्तीतील जेष्ठ महिलांना मिठाई व कपडे भेट स्वरूपात दिले. येथे बराचवेळ घालवल्यानंतर त्यांना किन्ही या गावातील पूजा खंगार व गौरव खंगार या आई-वडिलांचे छत्र गमावलेल्या मुलांची माहिती मिळाली. त्यांची आई कर्करोगाने आणि वडील हे करोनाने दगावले होते.

हेही वाचा : परदेशी शिष्यवृत्तीकडे मराठा विद्यार्थ्यांची पाठ, ओबीसी प्रवर्गात केवळ ५० उमेदवारांनाच संधी

हेही वाचा : गोंदियात दिवाळीच्या रात्री दुचाकीला धडक दिल्याने तरुणाला तिघांनी चाकूने भोसकले, तरुणाचा मृत्यू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पारवे यांनी खंगार यांच्या दोन्ही मुलांच्या घरी जाऊन दोघांच्या डोक्यावर वडीलकीच्या नात्याने हात फिरवला. दोघांसोबत जेवण करत त्यांना भेटवस्तू दिल्या. त्यानंतर फटाके सर्वांनी मिळून फोडले. याप्रसंगी प्रसिद्धीमाध्यमांना पारवे म्हणाले, आपल्यामुळे कोणाच्या आयुष्यात सुखाचा दिवा लागावा हा मानस माझा असतो आणि आज तोच संकल्प पुढे नेत काहींच्या आयुष्यात आनंद पेरता आल्याचा आनंद आहे.