वर्धा : घराबाहेर पडलेला माणूस सुखरूप घरी येईल की नाही याची शाश्वती नसल्याचे नेहमी म्हटल्या जाते. या घटनेत तसाच दुर्दैवी प्रकार घडला आहे. राहुल श्रीनाते व मंगेश राऊत हे दुचाकीने वर्धा येथून आर्वीकडे जायला निघाले होते. वाटेत मोरांगणा परिसरातून जात असताना कुत्र्याचा मृतदेह पडून असल्याचे त्यांना दिसले नाही.

हेही वाचा : गोंदिया:भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; २ महिलांचा मृत्यू

त्यावर त्यांची दुचाकी धडकली. दुचाकी उसळून दोघेही खाली पडले.त्यात गृहरक्षक असलेले राहुल रामकिशन श्रीनाते हे ठार झाले तर चालक मंगेश जखमी आहेत. खरांगणा पोलीसांनी अपघाताची नोंद घेतली.