वर्धा : लोकसभा निवडणुकीसाठी मित्रपक्षांसोबत डिसेंबरअखेर चर्चा होईल, असे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले आहे. वर्धा दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सध्या मराठा, ओबीसी, आदिवासी असे आरक्षण विषयक प्रश्न समोर आहे. त्यामुळे जागावाटप ही बाब तूर्तास मागे पडली. शिवसेना, भाजप व आमचे नेते चर्चा करून मार्ग काढू, असे ते म्हणाले.

विधानसभा निवडणुकीचा कौल भाजप-शिवसेना यांनाच होता. पण त्यांचे मुख्यमंत्री पदावरून बिनसले. त्यामुळे पुढील घडामोडी घडल्या. आता आम्ही भाजप सोबत जावून पाप केल्याचा अपप्रचार केल्या जातो. पण खरे तर वरिष्ठांनी यापूर्वीच तशा हालचाली सुरू केल्या होत्या, असा पुनरुच्चारही तटकरे यांनी यावेळी केला.

हेही वाचा : शेतकऱ्याची अडवणूक करणे लाईनमनला पडले महागात; काय आहे प्रकार?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ग्रामपंचायत निवडणुकीत आमच्याच गटाला मोठे यश मिळाले. पाचशेवर ग्रामपंचायतींवर आमच्या गटाचा झेंडा फडकला आहे. त्यामुळे खरा राष्ट्रवादी पक्ष कुणाचा हे सिद्ध झाले आहे. तपास यंत्रणेच्या धाकावर आम्ही भाजप सोबत गेलो नाही. केंद्रात एनडीए सोबत जाण्याच्या घडामोडी पूर्वीच झाल्या. त्याचेच अनुकरण महाराष्ट्रात झाले. ओबीसी घटकांचे प्रश्न सोडविले जात असल्याचे ते म्हणाले. यावेळी रुपाली चाकणकर, सुबोध मोहिते, दिवाकर गमे उपस्थित होते.