वर्धा: आतेभावाची मामाच्या मुलीशी सोयरिक जोडण्याची प्रथा नवीन नाही. लहानपणापासून बहिणीकडे आपली मुलगी सून म्हणून पाठविण्याचे स्वप्न काही मामा पाहत असतात. पण, या प्रकरणात जे घडले ते जरा वेगळे आहे.

मामाच्या मुलीवर लक्की बढेल हा डोळा ठेवून होता. समुद्रपुर येथील गजानन महाराज देवस्थानात मामा अशोक नकवे व सोबती कमल दुमार राहतात. भाचा लक्की पण सोबतच राहायचा. लक्कीने मामाला त्याच्या मुलीसोबत लग्न करून देण्याची गळ घातली. पण मामाने उत्तरच दिले नाही. त्यामुळे भाचा रागाने धुमसत होता.

हेही वाचा… ‘समृद्धी’वर आणखी एक ‘कलंक’! पशुधन चोरीचे प्रमाण वाढले, सहा अटकेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रविवारी रात्री हे दोघे गाढ झोपेत असताना लक्की याने दोघांवर धारधार शस्त्राने वार केले. त्यात दोघेही गंभीर जखमी झाल्याने त्यांना प्रथम ग्रामीण रुग्णालयात व नंतर सावांगीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांना या घटनेची माहिती होताच ते घटनास्थळी पोहचले. पण तो पर्यंत आरोपी फरार झाला होता. समुद्रपुरचे ठाणेदार प्रशांत काळे यांनी तपास सुरू केला आहे.