वर्धा : सध्या अंगणवाडी कर्मचारी संपावर आहेत. या संप कालावधीत जिल्हा परिषदेच्या मुख्याध्यापक व शिक्षकांनी संपावरील कर्मचाऱ्यांची कामे करावी, म्हणून शिक्षणाधिकारी कार्यालयाने पत्र काढले आहे. बालकांना पोषण आहार शिजवून तो वाढणे तसेच इयत्ता पहिलीत बसवून शिकविण्याचे निर्देश दिले आहेत. यास राज्य प्राथमिक शिक्षक समितीने विरोध केला आहे.

हेही वाचा : अमरावतीत २ हजार ६४६ अंगणवाडी केंद्र बंदच, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्‍या संपावर महिना उलटूनही तोडगा नाही

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आधीच नाना कामांमध्ये शिक्षक व्यस्त तसेच उपद्रवी उपक्रमामुळे त्रस्त असताना अंगणवाडीच्या लहान मुलांची जबाबदारी घेणे शक्य नसल्याचे शिक्षक नेते विजय कोंबे म्हणतात. आम्ही सदर कामांना नकार देत कोणतेही जबाबदारी न स्वीकारण्याचे आवाहन शिक्षकांना केले असल्याचे अजय बोबडे व श्रीकांत अहेरराव यांनी स्पष्ट केले. मात्र आमचा अंगणवाडी कर्मचारी संपास पाठिंबा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.