वर्धा : गत काही वर्षात वन्य प्राणी आणि त्यांचा गावालगतचा मुक्त संचार शेतकऱ्यांसाठी जीव मुठीत घेऊन जगण्यास भाग पाडणारा ठरत आहे. प्रामुख्याने वाघ, बिबट, अस्वल यांचा वावर गावाकऱ्यांच्या जीवावर बेतत असल्याच्या घटना घडल्या आहे. आता समुद्रपूर तालुक्यातील गिरड शिवारात एक वाघीण व तिचे तीन शावक यांचा मुक्त संचार सूरू आहे. शेत शिवारात गायीवर हल्ले झाले आहेत. खुरसापार ते मोहगाव दरम्यान या कुटुंबाचा संचार असल्याचे सांगण्यात येते. गायीवर हल्ला झाल्यानंतर तीन ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले होते. त्यात वाघीण व तीन शावक कैद झाले. आता २० कॅमेरे लावून नजर ठेवल्या जात आहे. या भागात काही शेतकरी जंगली प्राण्यांपासून संरक्षण मिळावे म्हणून विजेचा पुरवठा सूरू ठेवतात. त्याचा झटका वाघीनीस बसू शकतो. म्हणून ते टाळण्यासाठी वन खात्याने वीज कंपनीस रात्रीच्या वेळी वीज पुरवठा करू नये असे पत्र दिले आहे. हा परिसर जोपर्यंत वाघीण सोडून जात नाही तोवर पुरवठा बंद राहणार.

वन परीक्षेत्र अधिकारी नीलेश गावंडे यांनी खुरसापार, गिरड, पेठ, आर्वी, फरीदपूर, मोहगाव या गावातील गावकऱ्यांना सतर्क राहण्याचा ईशारा दिला आहे. क्षेत्र सहाय्यक पी. एस. नेहारे, वनरक्षक पी. डी. बेले व अन्य गस्त घालत आहे. सहायक वन संरक्षक अमरजीत पवार म्हणाले की वाघीण व तीन पिल्लावर नजर ठेवून आहोत. तर नीलेश गावंडे यांनी सांगितले की ही वाघीण वर्धा वन क्षेत्रातीलच आहे.

हेही वाचा : बुलढाणा : देवपूरवासी चढले ५५ फुट उंच पाण्याच्या टाकीवर! काय आहे कारण जाणून घ्या…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बोर या अभयारण्यातील वाघ व बिबट हे अलिकडच्या काळात गावालागत येत असल्याच्या घटना वारंवार घडू लागल्या आहेत. त्यामुळे अपघात पण होतात. ऑक्टोबर महिन्यात वर्धा नागपूर रस्त्यावर केळझर येथे एक मादी बिबट वाहनाची धडक बसून ठार झाली होती. मादी बिबट व वाघीण हे भक्ष्य शोधण्यासाठी सतत जवळचे ठिकाण शोधत असतात. गाव, महामार्ग, शहरी वसाहत अश्या परिसरात या हिंस्त्र प्राण्यांचा वावर वाढत असल्याचे निरीक्षण पशुसेवक आशिष गोस्वामी हे नोंदवितात.वर्धा बायपासवर बिबट फिरत असल्याचे आढळून आले होते.ही वाघीण अडीच वर्षाची असावी. उमरेड, बुटीबोरी व गिरड या ट्रॅगल मध्ये वावर होण्याची शक्यता व्यक्त होते. शोध घेण्यासाठी तसेच अनुचित प्रकार होवू नये म्हणून पुरेसे कॅमेरे कार्यरत असल्याचे वन विभाग सांगतो. रात्रीचा वीज पुरवठा याच कारणास्तव बंद आहे.