वाशीम : सोबत काम करणाऱ्या दोन मित्रांत वाद उफाळून आल्याने जेवण करीत असलेल्या मित्राच्या मानेवर कुऱ्हाडीने घाव घालून निर्घृण हत्या केल्याची घटना कारंजा तालुक्यातील टाकळी गावात शनिवारी रात्री घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आरोपी घटना स्थळावरून पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.

प्राप्त माहितीनुसार कारंजा तालुक्यातील टाकळी गावातील मृतक व आरोपी हे दोघे सोबत काम करीत असल्याचे समजते. नेहमी सोबत असणाऱ्या एका मित्राने दुसऱ्या मित्राच्या मानेवर कुऱ्हाडीने घाव घालून निर्घृण हत्या केल्याने गावात खळबळ उडाली आहे. शनिवारी रात्री दारू प्यायल्यानंतर संतोष घोरमोडे आणि त्याच्या मित्रामध्ये जोरदार शाब्दिक वाद झाला. यानंतर संतोष घोरमोडे हा स्वतः च्या घरी येऊन जेवण करीत होता. त्याचवेळी आलेल्या मित्राने अचानक संतोषच्या मानेवर कुऱ्हाडीने वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने संतोषचा जागेवरच मृत्यू झाला. आरोपी घटना स्थळारून पसार झाला असून हत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही, पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

हेही वाचा : गोंदिया : भाविकांची अनियंत्रित कार कालव्यात कोसळली; तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाशीम जिल्ह्यात बहुतांश गावात राजरोसपणे अवैध दारू विक्री केली जाते. यातून किरकोळ वाद उफाळून आल्याने हाणामारीच्या घटना देखील समोर येत आहेत. दारुमुळे अनेकांचे संसार उध्वस्त होत आहे. जिल्ह्यात पोलिसांचा दबदबा ओसरत चालला असून शहरी भागापूरती मर्यादित असलेली गुन्हेगारी आता ग्रामीण भागातही पोहचली आहे. त्यामुळे दारू विक्रेत्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.