वाशीम : गत दोन ते तीन दिवसापासून जिल्ह्यातील अनेक भागात रिमझिम पावसाने तर काही ठिकाणी जोरदार पाऊस झाल्याने नद्या ओसंडून वाहत आहेत. मंगळवारी रात्री पासून वाशीम, मंगरूळपीर व इतर ठिकाणी दमदार पाऊस झाला.काल रात्रीपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे मंगरुळपीर तालुक्यातील वनोजा येथील लेंडी नाल्याला पुर आल्याने वनोजा गाव आणि तांडा, महाविद्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, वनोजा ते पिंजर मार्गाचा संपर्क तुटला होता.
तसेच बरेचसे शेतकऱ्यांचे शेतीचेही नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. कारंजा, मानोरा आणि मंगरूळपीर तालुक्यात पाऊस चांगला झाला तर मालेगाव तालुक्यात मात्र पावसाचे प्रमाण कमी असून नागरिकांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.