नागपूर : गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या काळात काही ठिकाणी अधूनमधून हलक्या सरी कोसळल्या, पण पावसाने भक्तांच्या उत्साहात खोळंबा घातला नाही. अगदी विसर्जनाच्या दिवशी सुद्धा पाऊस कोसळतो की काय असे वाटत असतांनाच विसर्जनाच्या दिवशी देखील पावसाने भक्तांच्या उत्साहावर विरजण घातले नाही. मात्र, पाऊस पुन्हा एकदा तेवढ्याच जोमाने परतण्याची चिन्हे आहेत.

गणेशोत्सव म्हणजे भक्तांच्या आनंदाला अगदी उधाण आलेले असते. सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरवून गेलेल्या गणरायाने कालच भक्तांचा निरोप घेतला. या गणेशोत्सवात पावसाने देखील साथ देत भक्तांच्या आनंदावर विरजण पडू दिले नाही. मात्र, आता तोच पाऊस पुन्हा एकदा परतणार आहे.

हेही वाचा >>> अमेरिकेच्या प्रतिष्ठित फेलोशिपसाठी भारतातून निवड झालेल्या एकमेव अधिकारी!

हवामान खात्याचे संकेत काय?

भारतीय हवामान खात्याने राज्यात पावसाच्या दमदार आगमनाचे संकेत दिले आहेत.  सप्टेंबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात राज्यातील अनेक भागांमध्ये पुन्हा पाऊस दाखल होणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत. राज्यातील अनेक भागात गणेशोत्सव कालावधीत पावसाने विश्रांती घेतली. तर काही ठिकाणी राज्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळल्या. दरम्यान आता भारतीय हवामान खात्याने पुढील पाच दिवस राज्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा सारी कोसळतील असा अंदाज दिला आहे. गणपती विसर्जनाच्या सोहळ्यानंतर राज्यात काही भागांमध्ये पाऊस पुन्हा हजेरी लावेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

हेही वाचा >>> अमरावती एमआयडीसीत राम इंडस्ट्रिजला भीषण आग

महाराष्ट्रात पाऊस केव्हा?

सप्टेंबरच्या अखेरीस राज्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये दोन ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. २१ सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत महाराष्ट्रात पाऊस कोसळणार आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बहुतांशी भागात पावसाची शक्यता आहे. नांदेड, लातूर, परभणी, सांगली, सातारा, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर, कोकण, अहमदनगर , पुणे, बीड या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होणार आहे. या जिल्ह्यांमध्ये पाऊस बरसण्याची शक्यता आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हवामान खाते काय म्हणाले?

देशातील बहुतांश भागात पावसाची संततधार सुरू आहे. हा पाऊस आणखी काही दिवस कायम राहणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले. भारतीय हवामान खात्याने आज, बुधवारी  दिल्ली, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या काही भागात ढगाळ पावसाचा अंदाज जारी केला आहे.