बेळगाव कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कुख्यात गुंड जयेश पुजारी याने भाजपचे जेष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना १० कोटींच्या खंडणीसाठी धमकी दिली होती. पुजारीने सलद दुसऱ्यांदा धमकी दिल्यामुळे नागपूर पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत त्याला बेळगाव कारागृहातून प्रॉडक्शन वॉरंटवर ताब्यात घेऊन विमानाने नागपुरात आणले. त्याला आज मंगळवारी सायंकाळी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

हेही वाचा >>>बुलढाणा: “सातएक महिन्यांपूर्वी मुकादमाने माझ्या मुलाला गाडीत डांबून नेलं, तवापासून तो कुठं हाय देवालेच ठाऊक, त्याची भेट नाय की फोन नाय….”

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेळगाव कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या जयेश पुजारी याने गेल्या १४ जानेवारीला गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात दूरध्वनी करून १०० कोटींची खंडणी मागितली होती. खंडणी न दिल्यास बॉम्बस्फोट करण्याची धमकी दिली होती. त्यानंतर केलेल्या दूरध्वनीत १० कोटी रुपये प्रेयसीला ‘गुगल पे’ करण्यास सांगण्यात आले होते. या प्रकरणात कर्नाटकातल्या बेळगावमधील हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात असलेल्या जयेश पुजाराने कारागृहातूनमधून हे दूरध्वनी केल्याचेही पुढे आले होते. गडकरी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधून खंडणीची मागणी केल्याच्या आरोपाखाली नागपूर पोलिसांच्या पथकाने बेळगावमधील हिंडलगा कारागृहातील कैद्यांची चौकशी केली होती. यापूर्वी गडकरी यांना धमकी दिल्याप्रकरणी बंगळूरू येथील एका तरुणीला ताब्यात घेण्यात आले होते. ही तरुणी बंगळूरू येथील एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीत काम करते. तपास केला असता दूरध्वनी क्रमांक बंगळूर एका तरुणीचा असल्याचे आढळून आले. तसेच, तिचा एक मित्र कारागृहात असल्याची माहिती समोर आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुजारीची चौकशी नागपूरच्या पथकाकडून करण्यात आली. त्यानंतर पुजारीला विमानाने नागपुरात आणले. न्यायालयाकडून त्याची कोठडी मिळवण्यात येणार आहे. – अमितेश कुमार, पोलीस आयुक्त.