लोकसत्ता टीम

नागपूर : पाणी पुरवठ्यात वाढ होईल, या अपेक्षेने वस्तीतील मैदानाची जागा नव्या जलकुंभ उभारणीसाठी दिली. पण जलकुंभ पूर्ण झाल्यावर त्यातून इतर वस्त्यांना पाणी पुरवठा हे स्पष्ट झाले. ऐवढेच नव्हे तर पूर्वीपेक्षा कमी पाणी पुरवठा होऊ लागला. दुसरीकडे मुलांना खेळण्यासाठीच्या मैदानाचही दुरावस्था झाली. त्यामुळे नागपुरातील दक्षिण-पश्चिम नागपुरातील गणेश कॉलनी, शांती निकेतन या वस्त्यांची ‘तेलही गेले आणि तुपली’ अशी अवस्था झाली.

नागपुरातील दक्षिण-पश्चिम नागपूर हा विधानसभा मतदारसंघा भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मतदारसंघ आहे. केंद्र सरकारच्या अमृत कुंभ योजनेअंतगर्त राणा प्रतापनगर मधील गणेश कॉलनी , शांती निकेतन कॉलनीच्या मैदानावर जलकुंभ बांधण्यात आला. मात्र यातील पाणी परिसरातील वस्त्यांना न देता इतर वस्त्यांना देण्यात येत असल्याने लोकांमध्ये नाराजी आहे. इतर वस्त्यांप्रमाणेच जलकुंभानजिकच्या वस्त्यांनाही पाणीपुरवठा करावा, अशी मागणी या भागातील लोकांची आहे.

आणखी वाचा-कुतूहल : २१ जून वर्षातील सर्वात मोठा दिवस; जाणून घ्या वैशिष्ट्ये…

जलकुंभाच्या बांधकामुळे मैदानाची दुरावस्था झाली. तेथे मुलांना खेळण्यासाठी जागा नाही, त्यामुळे मैदान मुलांना खेळण्यायोग्य करून द्यावे, अन्यथा तिव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा गणेश कॉलनी, शांती निकेतन कॉलनीतील नागरिकांनी दिला आहे. सध्या गणेश कॉलनी, शांती निकेतन कॉलनीला गायत्री नगरच्या जलकुंभावरून पाणी पुरवठा होतो. या वस्त्या एका भागाला असल्याने तेथे पाणी पुरवठा पूर्ण क्षमतेने होत नाही. फक्त सायंकाळी एक तास पाणी पुरवठा होतो, सुरूवातीला गणेशा कॉलनी, शांती निकेतन कॉलनीला नवीन जलकुंभावरून पाणी पुरवठा होईल असे आश्वासन महापालिकेने दिले होते पण आता जलकुंभाचे काम पूर्ण झाले असून इतर वस्तयांना जलवाहिन्यांनी जोडण्यात आली आहे. पण ज्या वस्त्यांनी जलकुंभासाठी मैदानात जागा दिली, त्या वस्तीना डावलण्यात आले आहे. त्यामुळे महापालिकेने त्वरित दखल घ्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

आणखी वाचा-मुक्ताईमातेची पालखी निघाली विठुरायाच्या भेटीला, पंढरपुरात प्रथम प्रवेशाचा मान; उद्या मलकापुरात…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वस्तीमध्ये दोन वेळा पाणी येत होते, पण नवीन जलकुंभ तयार झाल्यापासून चाचणीच्या नावाखाली एक वेळा पाणी येत असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. काही वस्ती मध्ये गढूळ पाणी येत आहे. नागपूरचे खासदार नितीनजी गडकरी यांनी गणेश कॉलनी शांती निकेतन कॉलनीला नवीन जलकुंभावरून पाणी देण्याचे आश्वासन दिले होते. या संदर्भात नितीन गडकरी यांच्या कडे तक्रार करणार असल्याचे नागरिकांनी सांगितले. जलकुंभाच्या बांधणीसाठी बाधकाम साहित्य ठेवल्याने मैदानाची दुरावस्था झाली, तेथे आता मुले खेळू शकत नाही. त्याचाही फटका वरील वस्त्यांना बसला आहे. यातून महापालिका कसा मार्ग काढते हे पाहणे उत्सूकतेचे ठरणार आहे.