महेश बोकडे, लोकसत्ता

नागपूर : महानिर्मितीने औष्णिक विद्युत केंद्रासाठी लागणारा कोळसा धुवून स्वच्छ करण्याचे कंत्राट राज्य खनिकर्म महामंडळामार्फत काही खासगी वॉशरीजला दिले. परंतु, धुतल्यावरही कोळशाचा उष्मांक करारानुसार वाढण्याऐवजी घसरला आहे. महानिर्मितीने त्याबाबत खनिकर्म महामंडळाला पत्रही दिले असून पुन्हा कोल वॉशरीजचा वाद उफाळण्याची शक्यता आहे.

धुतलेल्या कोळशाच्या वापराने वीजनिर्मिती संच अधिक क्षमतेने काम करतात, प्रदूषण कमी होते आदी कारणे देत महानिर्मितीने पुन्हा धुतलेला कोळसा वापरणे सुरू केले. त्यासाठी राज्य खनिकर्म महामंडळामार्फत निविदा प्रक्रिया करत हिंद महामिनरल, एसीबी, रुक्माईसह इतर काही खासगी कंपन्यांना हे काम दिले गेले. यावेळी वॉशरीसोबत झालेल्या करारानुसार धुतल्यावर कोळशाचा उष्मांक ५०० ते ६०० जीसीव्हीने (एकूण उष्मांक मूल्य) वाढणे अपेक्षित आहे.

हेही वाचा >>> भाजप आणि शरद पवार एकत्र येणे अशक्य – आमदार बच्चू कडूंचे मत

महानिर्मितीने खनिकर्म महामंडळाला १ नोव्हेंबर २०२३ रोजी पत्र दिले. त्यानुसार मे-२०२३ मध्ये गोळा नमुन्यातील कच्च्या कोळशाचा उष्मांक ४,००९ होता. तो धुतल्यावर केवळ १७ ने वाढून उष्मांक ४०२६ झाला. त्यामुळे निकषाहून उष्मांक ४८३ ने कमी होता. जून-२०२३ मध्ये कच्च्या कोळशाचा उष्मांक ४,०१० होता. तो धुतल्यावर ३,८३८ झाला. जुलै २०२३ मध्ये कच्च्या कोळशाचा उष्मांक ४,००९ होता. तो आणखी कमी होऊन ३,७१५ झाला. त्यामुळे महानिर्मितीने पत्र लिहून खनिकर्म महामंडळाचे लक्ष वेधले आहे. महानिर्मितीने दिलेल्या सदर पत्रासोबत ‘लोकसत्ता’च्या नागपूर कार्यालयाला एक तक्रार प्राप्त झाली. त्यात या पद्धतीने कोळशाचा घोळ होऊन महागडी वीज नागरिकांना मिळत असल्याचाही आरोप केला गेला. या प्रकरणावरून कोल वॉशरीजच्या कामावर पुन्हा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

महानिर्मितीकडून कोल वॉशरीजकडून मिळणाऱ्या धुतलेल्या कोळशावर सतत नजर ठेवली जाते. त्यामुळेच खनिकर्म महामंडळाला उष्मांक कमी झाल्याचे पत्र लिहून वेळोवेळी सूचित केले जाते. या कामात अनुचित प्रकार घडण्याचा प्रश्नच उद्ड्टावत नाही.

– राजेश पाटील, कार्यकारी संचालक (कोळसा), महानिर्मिती, मुंबई.

कोल वॉशरीजमध्ये कोळसा धुतल्यावर कोळशातील उष्मांक करारानुसार वाढला नाही तर संबंधित कंपनीवर कारवाई करत दंडही आकारला जातो. त्यामुळे महानिर्मितीचे  नुकसान होत नाही. 

– प्रेम टेंड्टारे, महाव्यवस्थापक (ऑपरेशन्स),  खनिकर्म महामंडळ.

शिंदे गटाचा आमदार संशयाच्या भोवऱ्यात 

कोल वॉशरीजमधील घोळ प्रकरणात एकनाथ शिंदे गटात असलेला विदड्टरातील एक आमदार संशयाच्या भोवऱ्यात  आहे. त्यामुळेच महानिर्मितीकडून वारंवार महाराष्ट्र खनिकर्म महामंडळाला धुतलेल्या कोळशाचा उष्मांक कमी असल्याबाबत पत्र देऊनही संबंधित वॉशरीजवर कठोर कारवाई होत नसल्याची चर्चा  आहे.  सरकार या आमदाराला घाबरते काय, असाही  प्रश्न विचारला जात आहे