नागपूर : उपराजधानीत गुरुवारी  मुसळधार पावसाने हजेरी लावली. दुपारी एक वाजताच्या सुमारास शहरात सर्वत्र पाऊस झाला. शहरातील रस्ते पुन्हा एकदा दुथडी भरुन वाहू लागले. पावसाळा सुरू होऊन एक महिना लोटला तरीही नागपूरात पाऊस झालाच नाही.  गुरुवारी दुपारी मात्र जोरदार पावसाला सुरुवात झाली. अवघ्या काही वेळातच शहर ओलेचिंब झाले.

गेल्या काही दिवसांपासून पाऊस हुलकावणी देत होता. त्यामुळे ढगाळ वातावरण असले तरी पाऊस येणार नाही, ही नागपूरकरांची धारणा होती. त्यामुळे रेनकोटचे ओझे नकोच, अशाच अविर्भावात ते बाहेर पडत होते. त्यांना पावसाने चांगलाच फटका दिला. काहींनी शहरातील मेट्रोच्या पुलाचा आडोसा घेतला.